अंबडमधील दुभाजकातील धोक्याचे पंक्चर आयमाकडून बंद

अंबडमधील दुभाजकातील धोक्याचे पंक्चर आयमाकडून बंद
प्रातिनिधिक फोटो

सातपूर | Satpur

आयमा म्हणजेच अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (IMA) स्वतः पुढाकार घेत एमआयडीसीमधील (Ambad MIDC) अत्यंत धोकादायक पंक्चर (Dangerous Pancture) शुक्रवारी बंद केले.

यामुळे संभाव्य अपघाताची धोके टाळणे शक्य होणार असल्याचे मत आयमा अध्यक्ष वरूण तलवार यांनी व्यक्त केले.

गरवारे ते एक्स्लो पॉइंट या अंबड औद्योगिक वसाहतीतील अत्यंत महत्त्वाच्या व रहदारीच्या रस्त्यावर किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेड या

कंपनीच्या समोर दुभाजकामध्ये पंचर ठेवलेला आहे. त्यापासून थोडेच पुढे गेल्यानंतर एम ब्लॉकमध्ये जाण्याकरता पूर्वी एका दुभाजकाला पंचर होता. परंतु या पंचर मुळे वाहनांच्या अपघातांमध्ये वाढ होऊ लागली होती, काही लोकांना प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे हा पंक्चर बंद करण्याचा निर्णय आयमाच्या वतीने घेण्यात आला

अर्धा किलोमीटरचा अधिकचा प्रवास टाळण्याकरता अनेक कामगार, मालवाहतुकीची वाहने, टू व्हिलर, फोर व्हिलर, सायकलस्वारही किर्लोस्कर इंजिनपासून उलट्या दिशेने वाहने चालवत नेतात. त्यामुळे येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांचे अपघात होतात. याठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढत असून यामुळे अनेक कामगारांचे व निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत.

या पार्श्वभूमीवर अनेक दिवसापासून आयमाकडून पोलिस महापालिका एमआयडीसी यांच्याकडे पाठपुरावा करून हा किर्लोस्कर कंपनीसमोरील दुभाजकामधील पंक्चर बंद करावा व एम ब्लॉककरता स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली होती.

याबाबत ठोस निर्णय प्रलंबित राहील्याने व वाढत्या अपघातांच्या तक्रारी लक्षात घेत आयमा पदाधिकाऱ्यांनी परिसरातील उद्योजक व उद्योगांची चर्चा करून हा पंक्चर बंद करण्याकरता बॅरिकेडिंग लावून वाहतुकीचे नियोजन सुरळीत करण्याची कार्यवाही केली.

यावेळी आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार, उपाध्यक्ष निखिल पांचाळ, आयमा विश्वस्त समितीचे अध्यक्ष धनंजय बेळे, राजेंद्र पानसरे, विनीत जोहरी, जयंत जोगळेकर, किर्लोस्कर इंजिन ऑइल लिमिटेडचे अधिकारी जोशी, एचआर विभागाचे बोरसे आदींसह आयमाचे पदाधिकारी व उद्योजक उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com