दिंडोरी तालुक्यातील धरणे पाण्याविना उपासी

पाण्याची पातळी घटली
दिंडोरी
दिंडोरी

ओझे | Oze

दिंडोरी तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने आपला लहरी पणा दाखवत कमी पाऊस पडला. त्यामुळे परिणाम तालुक्यातील धरणावर होऊन पाण्याची पातळी घटली आहे.

दिंडोरी तालुक्याला संपूर्ण जिल्ह्यात पाण्याची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. मागील वर्षी या तालुक्यात पाऊस अव्वाच्या सव्वा पडल्याने तालुक्यातील सर्व धरणे १०० टक्के भरली होती. त्यामुळे आता तालुक्यावर पाणी टंचाई चे संकट येणार नाही.

यामुळे या तालुक्यातील शेतकरी वर्ग आनंदीत झाला होता. या तालुक्यावर इतर तालुके पाण्यासाठी आतुरलेले असतात. कारण या तालुक्यातील धरणातील काही पाण्याचा साठा इतर तालुक्यासाठी राखीव स्वरुपचा ठेवलेला असतो. म्हणून दिंडोरी तालुक्या प्रमाणे इतर तालुक्यामध्ये पाणी टंचाई चे संकट आले नाही. धरणातून इतर तालुक्याला पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी रोटेशन पध्दतीने सोडण्याचे वार्षिक नियोजन हे अगोदरच शासन करीत असते. त्यामुळे तालुक्यातील व तालुक्याबाहेरील शेतकरी वर्गावर पाण्याची टंचाई निर्माण होत नाही.

परंतु यंदा मात्र पावसाने दिंडोरी तालुक्यात आपला लहरी पणा दाखविल्यामुळे पाऊस पडण्याचे सरासरी प्रमाण मागील वर्षी पेक्षा कमी आहे. त्यामुळे राखीव व रोटेशन पध्दतीचे पाणी तालुक्याला व इतर तालुक्यानां सोडल्यामुळे प्रत्येक धरणाची पाण्याची पातळी घटली आहे. आता जोरदार पाऊस होईल. व पुन्हा एकदा धरणातील पाण्याचा साठ्यात वाढ होईल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील पालखेड प्रकल्प समुहातील मोठ्या व मध्यम प्रकल्पसमुहातील उपलब्ध पाणी साठ्याचा तुलनात्मक तक्ता या प्रमाणे आहे.

अ) पालखेड धरण समुह :

१) पालखेड (मोठे प्रकल्प) : संकल्पीत उपयुक्त पाणी साठा ( द.ल.घ.फु.) : ६५३. सन २०१९ चा पाणी साठा (द.ल.घ.फु) : १६३ . स

न २०१९ ची टक्केवारी :- २४.९६ . आजचा उपयुक्त पाणी साठा (२०२०)(द.ल.घ.फु.) : २०५. सन२०२० ची टक्केवारी : ३१.४२

२) करजंवण (मोठे प्रकल्प) : संकल्पीत उपयुक्त पाणी साठा (द.ल.घ.फु.) : ५३७१.सन२०१९चा पाणी साठा (द.ल.घ.फु.): २७१.सन २०१९ची टक्केवारी : ५.०५.आजचा उपयुक्त पाणी साठा (२०२०)(द.ल.घ.फु.) : ९३२. सन २०२०ची टक्केवारी : १७.३५

३) वाघाड (मोठे प्रकल्प) : संकल्पीत उपयुक्त पाणी साठा (द.ल.घ.फु.) : २३०२.सन २०१९चा पाणी साठा (द.ल.घ.फु.) : २०४.सन २०१९ची टक्केवारी : ८.८६.आजचा उपयुक्त पाणी साठा (२०२०)(द.ल.घ.फु.) : १९७.सन 2020ची टक्केवारी : ८.५८.

ब) ओझरखेड धरण समुह :

१) ओझरखेड (मध्यम प्रकल्प) : संकल्पीत उपयुक्त पाणी साठा (द.ल.घ.फु.) : २१३०.सन २०१९चा पाणी साठा (द.ल.घ.फु.) : ५६.सन २०१९ची टक्के वारी : २.६३.आजचा उपयुक्त पाणी साठा : ८५३.सन २०२० ची टक्के वारी : ४०.०२

२)पुणेगाव (मध्यम प्रकल्प) : संकल्पीत उपयुक्त पाणी साठा (द.ल.घ.फु.) : ६२०.सन २०१९चा पाणी साठा (द.ल.घ.फु.) : 00.00.सन २०१९ची टक्के वारी : 00.00.आजचा उपयुक्त पाणी साठा (२०२०) : ६८.सन२०२०ची टक्केवारी : १०.९९

३)तिसगाव (मध्यम प्रकल्प) : संकल्पीत उपयुक्त पाणी साठा (द.ल.घ.फु.) : ४५५.सन २०१९चा पाणी साठा (द.ल.घ.फु.) : 00.00.सन २०१९ ची टक्के वारी : 0.00 आजचा उपयुक्त पाणी साठा (द.ल.घ.फु.) (२०२०) : ३८.सन२०२०ची टक्केवारी : ८.३०

या प्रमाणे दिंडोरी तालुक्यातील मोठे प्रकल्प तीन. व मध्यम प्रकल्प तीन असे सहा धरणे आहे. परंतु तालुक्यात कमी पाऊस झाल्याने धरण्याच्या पाणी साठा अजून कमी असून तालुक्याला जोरदार पावसाची प्रतिक्षा लागली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com