
हरसूल | प्रतिनिधी | harsul
ऐन उन्हाळ्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा चटका सोसावा लागत असून पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. मनुष्याबरोबर पाळीव प्राणी, जंगली प्राणी, पशुपक्ष्यांना पाण्याच्या शोधात भटकंती करण्याची वेळ आली आहे. मात्र काही ठिकाणातील विहीर,नदी नाल्यांचे पाण्याचे स्रोतच आटल्याने ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागतो आहे.
जलपरिषद मित्र परिवाराने त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी तालुक्यात काही दिवसांपूर्वी हाती घेतलेल्या गाव तेथे वनराई बंधारा मोहिमेतील रिकाम्या गोण्यात माती अडविण्यात आलेले पाणी आजही वनराई बंधार्यात भर उन्हाळ्यात ही तुडुंब अवस्थेत बघावयास मिळत आहे.
मात्र हरसूल भागात पाणीटंचाई वर मात व्हावी ,भाग शेती रहित सुजलाम सुफलाम व्हावा, त्र्यंबकेश्वर तालुका पाणी टंचाईमुक्त आशा पल्लवित व्हाव्यात यासाठी मोठ्या प्रमाणात लहान मोठे सिमेंट बंधारे, केटी बंधारे तसेच पाझर तलावांची निर्मिती करण्यात आली. मात्र जानेवारी महिन्याच्या प्रारंभीच निर्मिती करण्यात आलेल्या लाखो रुपयांच्या बंधार्यात पाण्याचा खडखडाट पहावयास मिळत आहे.
मात्र जल परिषदेने निर्मिती केलेल्या वनराई बंधार्यात आजही काही ठिकाणी पाणी तुडुंब भरलेल्या अवस्थेत आहे.यामुळे वनराई बंधारे उन्हाळ्यात भेडसावणार्या पाणीटंचाई जीवनदायिनी ठरले आहे. तसेच काही गावांसाठी दशक्रिया विधी, वापरासाठी, जनावरांसाठी उपयुक्त ठरत आहेत.विशेष म्हणजे रिकाम्या माती टाकून अडविण्यात आलेले पाणी भर उन्हाळ्यातही तग धरून आहे. मात्र लाखोंच्या बंधार्यात खडखडाट दिसत असल्याने त्र्यंबकेश्वर तालुक्याची पाणीटंचाईची मोठी शोकांतिका आहे.