वावीत घरावर वीज पडून नुकसान; सुदैवाने जीवित हानी नाही

विद्युत उपकरणे जळाली
वावीत घरावर वीज पडून नुकसान;  सुदैवाने जीवित हानी नाही

वावी। प्रतिनिधी

आज सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास वावी येथील खळवाडी भागात विलास सच्चे यांच्या घरावर वीज कोसळली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून घराचे मात्र पत्रे फुटून पडझड झाली आहे. तसेच घरातील इलेक्ट्रिक साहित्याचीही राखरांगोळी झाली आहे.

सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास सच्चे यांचे घरावर वीज कोसळली. घरातील बाथरूम व टॉयलेटवर वीज पडल्याने तेथील पत्रे फुटून भिंतींना तडे गेले. तर विजेच्या मीटरसह घरातील संपूर्ण वायरिंगनेही पेट घेतला. यामुळे संपूर्ण घरात धूर पसरला होता. याचवेळी वीज पुरवठा देखील खंडित झाला होता.

शेजाऱ्यांनी घराकडे धाव घेतल्यावर विज पडल्याचा प्रकार लक्षात आला. सच्चे कुटुंबीय यावेळी घरातच होते. सुदैवाने ते सर्वजण सुखरूप बचावले. घरातील इलेक्ट्रिक साहित्य मात्र या घटनेत जळून खाक झाले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com