चाळीतला सडका कांदा शोधता येणार; अत्याधुनिक सेन्सर विषयी जाणून घ्या

चाळीतला सडका कांदा शोधता येणार; अत्याधुनिक सेन्सर विषयी जाणून घ्या

लासलगाव । वार्ताहर Lasalgaon

कांदा चाळीत ( Onion Chawl ) चुकीच्या साठवणुक पध्दतीमुळे साधरण ३० ते ४० टक्के कांदा सडून जातो त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते.चाळीमध्ये कांदा सडण्यास सुरुवात झाल्या बरोबर शोधता आले तर उरलेला कांदा वाचविता येतो शेतकऱ्यांचे होणारे नुकसना टाळता यावे.या दृष्टीने नाशिक येथील वैज्ञानिक प्रा.डॉ.ओमप्रकाश कुलकर्णी ( Scientist Prof. Dr. Omprakash Kulkarni ) यांनी सेन्सरचा ( Sensor ) उपयोग करत उपकरण (Equipment ) बनवले आहे.

अमोनिया,आद्रता आणि गॅस वरून सडलेला कांदा या उपकरणातून शोधून काढला जाणार आहे.या उपकरणाचा डेमो नाफेडचे नवी दिल्लीचे संचालक अशोक ठाकूर, माजी कृषी मंत्री अनिल बोंडे,लासलगाव बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांना लासलगावी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले . नाफेडच्या वतीने हे उपकरण प्रस्तावित करण्याचे आश्वासन नाफेडचे संचालक अशोक ठाकूर यांनी दिले आहे.

कांदा चाळीत सदरचे उपकरण ठेवून कांद्याची आद्रतावरून कांदा चाळीत कुठल्या भागात सडला आहे हे उपरकन सेन्सर द्वारे दर्शवितो.या उपकरणामुळे खराब होणारा कांदा तात्काळ लक्षात येऊन तो चाळीतून बाहेर काढून बाकीचा कांदा खराब होण्यापासून वाचविता येणार आहे.

कांदा बाजारभावात तेजीमंदीने येणारे चढ उतार हे पाहून या समस्येवर काही तरी तोडगा काढला पाहिजे असा विचार केला.यांचा अभ्यास करताना असे लक्षात आलं, शंभर किलो कांदा जेव्हा शेतकरी साठवणूक करण्यासाठी गोदामात पाठवतो, तेव्हा त्यातील ३०-४०% कांदा खराब होतो. या समस्येवर उपाय योजना गरजेची आहे हे जाणवलं यातून या उपकरणाची निर्मिती करण्याचे सुचले आणि ते कृतीत उतरविले. असे ओमप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com