वादळी पावसाने द्राक्षबाग भुईसपाट

वादळी पावसाने द्राक्षबाग भुईसपाट

ओझे । वार्ताहर Ozhe

ओझे (ozhe) येथे सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यासह (Stormy winds) जोरदार पाऊस (rain) पडल्यामुळे ओझे येथील समाधान पठाडे या शेतकर्‍याची (farmer) अडीच एकर द्राक्षबाग (Vineyard) भूईसपाट झाल्यामुळे

मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे रब्बी हंगामातील (rabbi season) काढणीला आलेल्या गहू, हरबरा, कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याचा प्रथामिक अंदाज शेतकरी वर्गाकडून व्यक्त केला जात आहे.

या अवकाळी व बेमोसमी पावसाने (Untimely and unseasonal rains) काढणीला आलेल्या व पेपर लावलेल्या निर्यातक्षम द्राक्षबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. पेपरमध्ये असणार्‍या द्राक्षबागेत पाऊस पडल्यास द्राक्ष मण्यांना तडे जावून संपूर्ण द्राक्षबागाना क्रकिंगची मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळे ज्या परिसरात पाऊस (rain) झाला. त्या ठिकाणीच्या द्राक्षबागाचे नुकसान (Damage to the vineyard) होणार असल्यांचे बोलले जात आहे.

नेहमीप्रमाणे चालू वर्षीही अवकाळी व बेमोसमी बळीराजाला मोठा फटका बसल्याने शेतकरी (farmer) आर्थिक कोंडीत सापडला आहे. वर्षभर खर्च करून देण्याच्या वेळेस द्राक्षबागाचे नुकसान होत असेल तर आता द्राक्षउत्पादकांनी द्राक्ष पिक घ्यावा कि नाही असा प्रश्न उभा राहिला आहे. ज्या शेतकर्‍यांचे वादळीवार्‍यासह पावसाने नुकसान झाले त्या शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com