बेमोसमी पावसाचा फटका; उन्हाळ कांद्याचे मोठे नुकसान

बेमोसमी पावसाचा फटका; उन्हाळ कांद्याचे मोठे नुकसान

मेशी | वार्ताहर | Meshi

देवळा तालुक्यातील (Deola Taluka) मेशी परिसरात (Meshi Area) वादळी वार्‍यासह अचानक कोसळलेल्या बेमोसमी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकर्‍यांची (Farmers) धावपळ उडाली. या पावसामुळे (Rain) काढणीला आलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतात काढणी केलेला कांदाही (Onions) पूर्णपणे पाण्यात भिजल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत....

मेशीसह परिसरातील निंबोळा, महालपाटणे, देवपूरपाडे, रणादेवपाडे, वासुळ तसेच तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) शेतकर्‍यांची धांदल उडविली. आधीच भारनियमन (Load shedding) व गेल्या महिन्यातील पावसामुळे (Rain) करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कांद्याच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. आता कांदा काढणी सुरू असतांना मजूर टंचाई व उन्हामुळे कांदा काढण्यास मजूर मिळवितांना शेतकर्‍यांना (Farmers) तारेवरची कसरत करावी लागली.

अनेक शेतकर्‍यांनी मजुरांची जुळवाजुळव करून कांदा काढणी केली असून काहींचा कांदा काढणी योग्य झाला आहे. काल अचानक बेमोसमी पावसाने (Rain) तडाखा दिल्याने काढणी केलेला कांदा (Onion) झाकण्यासही शेतकर्‍यांना उसंत मिळाली नाही. जेमतेम हाताशी आलेला कांदा भिजल्याने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

या पावसामुळे (Rain) उन्हाळ कांद्यावर अवलंबून असणारे आर्थिक गणित पूर्णत: बिघडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. वादळी वार्‍यामुळे परिसरातील शेतकर्‍यांचे पत्र्याची शेड, तसेच काही ठिकाणी वृक्ष व विजेचे खांबही कोसळल्याने वीज पुरवठा (Power supply) खंडीत झाला होता. हवामान विभागातर्फे (IMD) आणखी दोन-तीन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असल्याने शेतकर्‍यांच्या (Farmers) चिंतेत वाढ झाली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com