घोटी | Ghoti

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील धामणगाव घोटी खुर्द रोड येथील शेतकऱ्यांचा तोडीवर आलेला जवळपास पाच एकर ऊस शेतातील विद्युत तारांच्या शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला.

दरम्यान रविवार (ता.२९)सकाळी दहा अकरा वाजेच्या सुमारास धामणगाव परिसरात जोरदार वारा चालू होता.

यावेळी काही स्थानिक शेतकऱ्यांच्या उसाच्या शेतातून गेलेल्या वीजेच्या तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने शॉर्ट सर्किट झाला.

शॉर्ट सर्किटमुळे आगीचे लोळ उसाच्या शेतात पडले. तोडीवर आलेला वाळलेल्या उसाने जोरदार पेट घेतल्याने चार एकर ऊस जळून खाक झाला.