इगतपुरी : एक एकर वांग्यांच्या रोपांची कत्तल

इगतपुरी : एक एकर वांग्यांच्या रोपांची कत्तल

टाकेद । Taked

परिसरातील माणिकखांब येथील शेतकरी माधव किसन आडोळे याच्या शेतातील एक एकर वांग्याच्या झाडांंची अज्ञात व्यक्तीने शनिवारी (दि. 26) रात्री विळा व कोयत्याने कत्तल केल्याने या शेतकर्‍याला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

आडोळे यांनी मोठ्या कष्टाने एक एकर क्षेत्रावर वांगे लावले होते. हजारो रुपये त्यासाठी खर्च केला होता. आता प्रत्येक झाडावर दिसणारे वांगे त्यांचा उत्साह वाढवत होता.

यंदा वांग्याचे चांगले उप्तन्न येईल असा विचार करुन पूढची स्वप्न पाहणार्‍या आडोळे यांचे स्वप्नच अज्ञात माथेफिूरुने उध्वस्त करुन टाकले आहे.

संपूर्ण एक एकर क्षेत्रावरील वांग्याची रोपे तोडल्याने हाता-तोंडाशी आलेले पिक हातचे गेले असून या समाजकंटकाचा शोध घेऊन त्याच्या विरोधात कारवाई करावी व आडोळे यांना शासनाने आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com