मका पीक
मका पीक
नाशिक

बोलठाण परिसरात वादळी पावसाने मका पिकाचे नुकसान

पाहणी करण्याची मागणी

Gokul Pawar

Gokul Pawar

बोलठाण | बोलठाण

शुक्रवारी झालेल्या वादळी पावसाने मक्का पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याबाबत कृषी विभागाने तात्काळ पाहणी करून पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

बोलठाण परिसरात शुक्रवारी झालेल्या वादळी पावसाने मका पिकाचे नुकसान झाले आहे. साधारण तासभर पाऊस झाल्याने मका, कपाशी, बाजरी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मका व बाजरी पिके वाऱ्याने आडवी झाल्याने शेतकऱ्यांपुढे प्रश्न उभा राहिला आहे.

५० ते ६० टक्के क्षेत्र बाधित झाल्याने या पिकावर झालेला खर्च ही वसूल होईल की नाही असा प्रश्न पडला असल्याने वार्षिक गणित कसे जुळेल ही मोठी समस्या होऊन बसली आहे, तरी शासनाने याकडे लक्ष केंद्रित करावे.

- संजय पवार, शेतकरी बोलठाण

Deshdoot
www.deshdoot.com