ढगफुटीमुळे खरीप पिकांचे नुकसान

ढगफुटीमुळे खरीप पिकांचे नुकसान

लासलगाव। वार्ताहर Lasalgaon

ब्राम्हणगाव (Bramhangaon), विंचूर (Vinchur), वेळापूर येथे जोरदार परतीचा पाऊस (Heavy Rain) बरसल्याने शेतातील संपूर्ण पीके पाण्याखाली गेली असून हातात आलेल्या पिकांचे नुकसान (Crop damage) झाल्याने या नैसर्गिक आपत्तीपुढे शेतकरी (Farmers) हतबल ठरला आहे.

परतीच्या पावसाने ब्राम्हणगाव पूर्व व उत्तर भाग अक्षरश: झोडपून काढल्यानेे यात केदू न्याहरकर यांचे 4 किलो लाल कांद्याचे बियाणे (Onion seeds), बाळासाहेब गवळी यांचे 14 किलो उन्हाळ कांदा बियाणे, सुनील गवळी यांचे 6 किलो उन्हाळ कांद्याचे बियाणे या पावसात वाया गेले आहे. तर वेळापूर येथील अर्जुन पालवे, सौरभ कुटे, संजय कुटे, आप्पा पालवे, गणेश ठाकरे, मिलिंद पालवे,

गणपत कुटे, कैलास कुटे, अर्जुन शिंदे यांच्या सोयाबीन व मका पिकात पाणी साचल्याने हे पीक पूर्णपणे वाया जाण्याचा धोका वाढला आहे. या शेतकर्‍यांप्रमाणेच वेळापूर, ब्राम्हणगाव, विंचूर परिसरात देखील ढगफुटी (Cloudburst) झाल्याने सोयाबीन, मका, कांदा बियाणे, भाजीपाला पिकांचे नुकसान (Damage to vegetable crops) झाले आहे. गेल्या दोन वर्षापासून करोना संसर्गामुळे येथील द्राक्षे उत्पादक शेतकरी परतीच्या पावसामुळे अडचणीत आला आहे.

छाटणी झालेल्या बागेतील घडकूज होत असून झाडांच्या मुळ्या चोकअप होऊ लागल्या आहे. प्रतिकूल हवामानामुळे डाऊनी सारख्या रोगाचा प्रादूर्भाव वाढत असून औषध फवारणी खर्चात वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील कुंभारी, पंचकेश्वर, देवपूर परिसरात देखील ढगफुटी होऊन तेथील द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तालुक्यात द्राक्षबागांचे क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे शासनाच्या महसूल विभागाने बागांसह सर्व शेतीपिकांचे पंचनामे तत्काळ करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी.

Related Stories

No stories found.