हतगड l Hatgad (वार्ताहर)

सुरगाणा तालुक्यातील आंबाठा पैकी लोळणी या गावी (दि. २८) रोजीच्या जोरदार चक्री वादळाने मुरलीधर काळू गायकवाड यांचे दु. २.३०च्या सुमारास चक्री वादळ घरात घुसून पत्र्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

सदर नुकसानी मध्ये कुठल्याही प्रकारची जीवित व प्राणहानी झालेली नाही. होळीच्या दिवशी हा प्रकार घडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. सदर घटना स्थळी जाऊन तलाठी आर. ए. सुलाने यांनी आपग्रस्त इसमाचे घराचे पंचनामा केला.

त्यावेळी झालेले नुकसान पंचनामा नुसार पंचांनूमते एकूण अंदाजे रक्कम ७४७३०/- एवढी आहे. तरी तलाठी यांना आपग्रस्त इसमाने जबाब दिला आहे. की आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने शासना तर्फे योग्य ती मदत मिळावी.

तसेच पंचनामा वेळी आर. सुलाने तलाठी, पंच मधुकर गायकवाड, रामदास गायकवाड, परशराम गायकवाड, बाळू गांगोडे, भास्कर पवार, नारायण चौधरी, तुळशीराम गावित आदींच्या उपस्थितीत पंचनामा करून मुरलीधर गायकवाड यांना तात्काळ मदत मिळावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.