तणनाशक फवारल्याने पाच एकर शेतीचे नुकसान

तणनाशक फवारल्याने पाच एकर शेतीचे नुकसान

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

तळेगाव (अंजनेरी Anjneri) ता.नाशिक (Nashik) येथील तरुण शेतकरी संदिप देवकीसन दाते मोठ्या कष्टाने पेरु आणि शेवग्याची पाच एकर बाग यशस्वी ऊभी केली होती.

आज सकाळी ते शेतात फेरफटका मारायला गेल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की, आपल्या बागेवर कुणी तरी तणनाशक फवारले आहे. त्यामुळे शेवग्याची व पेरुची पाने पिवळी पडुन गळत होती.

सदर घटना लक्षात येताच त्यांनी आजुबाजुच्या शेतकऱ्यांना हि गोष्ट दाखवली. सर्व शेतकऱ्यांनी ह्या गोष्टी बद्दल संताप व्यक्त केला. सदर शेतकऱ्यांनी या बाबतची माहिती शिवसेना नेते शांताराम (बापु) चव्हाण यांना दिली.

कृषी अधिकारी राहुल शिंदे (Agriculture Officer ) यांना रोशन चव्हाण यांनी माहिती देताच कृषी अधिकारी त्वरीत घटनास्थळी दाखल झाले.

सबंधित त्र्यंबक पोलिस स्टेशन (Trimbak Police Station) येथे पिडीत शेतकरी संदिप दाते यांनी पोलिस तक्रार दाखल क़ेली आहे. वरीष्ठ पोलिस अधिकारी रनदिवे यांनी तात्काळ घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन पुढिल तपास करुन लवकरच संशयितास अटक केली जाईल असे शेतकऱ्यांना आश्वासन दिले.

आधीच शेतकरी खतांच्या, औषधांच्या, बियान्यांच्या वाढत्या किमतीमुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे हैराण झालेला आहे. त्यात कर्जाचे ओझे, विजेचा लंपडाव, विजेचे वाढते बिलं यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

त्यात असे झालेले नुकसान शेतकऱ्याला परवडणार नाहिये तरी शासनाने अशा शेतकऱ्याला दिलासा देवुन झालेल्या नूकसानीची भरपाई मिळण्याची तरतुद करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com