जिल्ह्यात अवकाळीमुळे सहा हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान

जिल्हा प्रशासनाची माहिती
जिल्ह्यात अवकाळीमुळे सहा हजार हेक्‍टरवरील  पिकांचे नुकसान

नाशिक । Nashik

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे सहा हजार 89 हेक्‍टर पिकांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान जिल्ह्यातील अनेक भागात गुरुवारी संध्याकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या पावसाने द्राक्ष, कांदा, हरभरा व गहू पिकाचे मोठे नुकसान झाले.

गुरुवारी आलेल्या अचानक वादळी वाऱ्यासह कमी-अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस झाल्याने नाशिक जिल्ह्यात ओझर, निफाड आणि पिंपळगाव बसवंत या भागात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. एकूणच जिल्ह्यातील सहा हजार ८९ हेक्‍टर पिकांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

तर लासलगाव, विंचूरसह परिसरात तुरळक पाऊस झाला मात्र वादळ मोठ्या प्रमाणात द्राक्ष आणि गहू पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या कांद्याला तीन ते चार हजार रुपये इतका बाजार भाव असताना त्यात आता या अवकाळी पावसाचा फटका बसल्याने कांद्याच्या पिकाचे नुकसान होत बाजार भाव घसरण्याची भीती कांदा उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com