Video : शेतात चक्कर टाकली तरी रडू येतं; भातशेती पाण्याखाली, टोमॅटोला पडली छिद्रे
दिंडोरी | Dindori
तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील शेतकरी (Farmers) अवकाळी पावसामुळे (Rain) संकटात सापडला आहे. यात मोठ्या प्रमाणात शेतीमालाचे नुकसान झाले आहे. शेतीमालाचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी (Demand) शेतकरीवर्गाकडून होत आहे...
कालपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने (unseasonal rain) बळीराजा संकटात सापडला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. भात शेती, टोमॅटो, कारली, दोडकी व इतर शेती मालाचे मोठे नुकसान झाले आहे.
एकीकडे संपूर्ण कापणी करून ठेवलेली भात शेती अवकाळी पावसाने पाण्याखाली गेली आहे. तर दुसरीकडे टोमॅटो, कारले, दोडके, भोपळ्याचे शेताचे नुकसान झाले आहे. यात शेतकऱ्यांनी खर्च केलेले भांडवल निघण्याआधीच निसर्गाने त्यांच्या अपेक्षेवर जणू काही पाणीच फेरले आहे.
गेली दोन वर्षे करोनाने (Corona) शेतकरी वर्ग संकटात सापडला होता. त्यातून कुठे सावरतो तोच पुन्हा अवकाळी पावसामुळे कर्जबाजारी होतो की काय असे चित्र दिसत आहे. त्यामुळे शासनाने त्वरित शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून, योग्य ती मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.