अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान

भेंडाळी। वार्ताहर Bhendali

तालुक्याच्या दक्षिण भागात तालुक्याच्या सरहद्दीवरील परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे ( Heavy Rain )शेतात पाणी साचून हातात आलेली पिके वाया जाण्याचा धोका वाढला आहे. यावर्षी प्रथमच मोठा पाऊस झाल्याने सरस्वती नदीला पूर आल्याने भेंडाळी-औरंगपूरला जोडणार्‍या पुलावरून पाणी वाहू लागल्याने हा मार्ग खंडीत झाला आहे.

भेंडाळी, औरंगपूर, महाजनपूर, बागलवाडी, तळवाडे, पिंपळगाव निपाणी परिसरात गुरुवारी सायंकाळी व शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सध्या मका, सोयाबीन, टोमॅटोे, भाजीपाला ही पीके हातात येण्याची वेळ झाली असतांनाच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अति पाण्यामुळे पिके सडू लागली आहे.

त्यामुळे या पिकावर झालेला खर्च व शेतकर्‍यांची मेहनत वाया जाणार आहे. परिसरात सर्वाधिक क्षेत्रावर द्राक्षबागा उभ्या असून या बागेमध्ये पावसाचे पाणी साचल्याने द्राक्षबागांची मशागत थंडावली आहे. द्राक्षवेलींना मुळ्या फुटू लागल्याने यावर्षी द्राक्ष उत्पादनात घट होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com