संततधार पावसाने शेती पिकांचे नुकसान

संततधार पावसाने शेती पिकांचे नुकसान

बोलठाण | Bolthan

नांदगाव तालुक्यातील (Nandgoan taluka) बोलठाण सह (Bolthan Area) घाटमाथ्यावर गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले खरे मात्र आत्ता परिसरातील मूग, बाजरी, कपाशी पिकांची झाडे अती पावसाने पिवळी पडून कोमजत आहे. तर गोंडेगाव येथे मूग पिकांचे मोठे नुकसान होत आहे. म्हणतात ना कोणती ही गोष्ट ही गरजेपेक्षा अधिक मिळाली की ती नुकसान करून जाते तसा प्रकार होत आहे....

पावसाने दडी दिल्या नंतर पाऊस कधी पडेल म्हणून चिंतेत असलेला बळीराजा सततच्या पावसाने संकटात सापडला आहे. सततच्या पावसाने पिके बसण्यास सुरवात झाली असून यात कपाशी पिकांची झाडे पिवळी पडत आहे.

तर गोंडेगाव परिसरात मूग पिकांना अक्षरशः मोड फुडल्याचे दिसून येते. मूग पीक यावर्षी चांगल्या प्रमाणात असून उत्पन्न ही चांगले होईल अशी आशा आहे, मात्र पावसाने विश्रांती घेतली नाही तर हातात येणारे पीक डोळ्यासमोर नुकसान होईल हे तितकेच खरें.

कृषी विभागाने (Krushi Department) परिसरातील पीक पाहणी करावी, झालेल्या नुकसानी बाबत शासन दरबारी माहिती कळवावी अशी मागणी शेतकरी करत आहे.

सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे मुग, उडीद पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. माझा दोन एकर मूग असून आत्ता मुगाच्या शेंगाना मोड फुटत आहे.

कैलास जाधव, शेतकरी गोंडेगाव

चार ते पाच दिवसा पासून सुरू असलेल्या पावसाने शेतात कपाशी पिकाची झाडे पिवळी पडली असून अतिरिक्त फवारणी करून ही झाड वाचेल की नाही सांगता येत नाही.

ज्ञानेश्वर काळे, शेतकरी बोलठाण

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com