वादळी पावसाने नुकसान

वादळी पावसाने नुकसान

बोलठाण । वार्ताहर Bolthan

बोलठाण सह घाटमाथा परिसरात शुक्रवारी झालेल्या वादळी पावसाने मक्का पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याबाबत कृषी विभागाने तात्काळ पाहणी करून पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

परिसरावर शुक्रवारी झालेल्या वादळी पावसाने मक्का पिके होतेच नव्हते करून सोडल्याने शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेल्या वादळी वार्‍या सह १ तास चाललेल्या पावसाने मका, कपाशी, बाजरी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.मक्का व बाजरी उंची मोठी असल्याने पाऊस व वार्‍या मुळे आडव्या झाला असल्याने आत्ता हे पीक हात चे गेल्या मुळे पुढे काय असा प्रश्न उभा राहिला आहे.परिसरात नगदी पीक म्हणून मक्का पिका कडे पाहिले जात असल्याने गेल्या ४ वर्षापासून मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

कोरोना पार्श्वभूमीवर आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजा ला आत्ता नैसर्गिक संकटाने ही आपल्या विळख्यात घेतल्याने दुष्काळात १३

वा महिना म्हणी प्रमाणे झाले आहे. लागवड केलेल्या क्षेत्रापैकी साधारण ४० ते ५० टक्के क्षेत्र पावसाने वार्‍याने बाधित केले आहे तसेमच बाजरी पिकांचे ही नुकसान झाल्याने मक्का व बाजरी ही पिके उत्पन्न न देता खर्चात भर टाकून जाणारी ठरणारी आहे.

शुक्रवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने मका व बाजरी पिकांची पुरती वाट लावली आहे लागवड केलेल्या क्षेत्रापैकी ५० ते ६० टक्के क्षेत्र बाधित झाल्याने या पिकावर झालेला खर्च ही वसूल होईल की नाही असा प्रश्न पडला असल्याने वार्षिक गणित कसे जुळेल ही मोठी समस्या होऊन बसली आहे तरी शासनाने याकडे लक्ष केंद्रित करावे.

- संजय पवार शेतकरी बोलठाण

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com