बंधार्‍याचे पाणी शेतात; भाजीपाल्यासह खरीप पिकांची अतोनात हानी

बंधार्‍याचे पाणी शेतात; भाजीपाल्यासह खरीप पिकांची अतोनात हानी

लोहोणेर । वार्ताहर | Lohoner

गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे (heavy raifall) येथील खाटकी नाल्यावर असलेले काळवट-तानाजी सागर बंधारा (Kalwat-Tanaji Sagar Dam) तुडूंब भरले.

या बंधार्‍याचे ओव्हरफ्लो (overflow) होवून पाणी आजुबाजूच्या शेतात घुसल्याने उभ्या पिकांची अतोनात हानी (crop damage) झाल्याने शेतकरी (farmers) हवालदिल झाले आहेत. शासनाने नुकसानीचे पंचनामे (panchanama) तातडीने करत भरपाई द्यावी, अशी मागणी आपद्ग्रस्त शेतकर्‍यांतर्फे केली जात आहे. संततधार पावसामुळे (heavy rain) शेतकर्‍यांचा भाजीपाला (vegetables), मका (Maize), बाजरीचे (millet) अतोनात नुकसान झाले आहे.

अशातच खाटकी नाल्यावर असलेले तानाजी सागर केटीवेअर बंधारा ओव्हरफ्लो (Dam overflow) झाले तसेच बंधार्‍याचा सांडवा निघाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी बंधार्‍यालगत असलेल्या शेतांमध्ये घुसल्याने पिके पाण्याखाली जावून शेतजमीनींना तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्याने शेतकर्‍यांचा भाजीपाला, मका, बाजरी, टमाटे आदी पिकांची अतोनात हानी झाली आहे.

पाण्याने तुडूंब बंधारा भरल्याने सर्वत्र पाणी झाले असल्याने बंधार्‍यालगत जमिनी असलेल्या शेतकर्‍यांचा जाण्यायेण्याचे मार्ग बंद पडले आहेत. पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने चाळीतील कांदा (onion) सडत असल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे

शासनाने नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई (compensation for damages) द्यावी व पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी स्थानिक शेतकर्‍यांकडून केली जात आहे. बंधारा पूर पाण्याने तुडुंब भरून सांडवा निघाल्याने आज सकाळी येथील काही शेतकरी युवकांनी जलपूजन करून धरणात नारळ अर्पण केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com