धरणाला गळती; लाखो लिटर पाणी वाया

ग्रामस्थांचा धडक मोर्चा काढण्याचा इशारा
धरणाला गळती; लाखो लिटर पाणी वाया

नामपूर । वार्ताहर | Nampur

बागलाण तालुक्यातील (baglan taluka) काटवन भागाला जीवदान देणार्‍या तळवाडेभामेर धरण (Talwadebhamer Dam) मुसळधार पर्जन्यवृष्टीने (heavy rain) तुडूंब भरले असल्याने ग्रामस्थांसह शेतकर्‍यांना (farmers) मोठा दिलासा मिळाला आहे.

मात्र धरणाच्या एमआय टँकला पुन्हा गळती लागून लाखो लिटर पाणी वाया (Waste of water) जात असतांना संबंधित यंत्रणेचे या गळतीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांतर्फे संताप व्यक्त केला जात आहे.

बागलाण तालुक्यात हरणबारी (haranbari) नंतर तळवाडेभामेर धरण दुसर्‍या क्रमांकाचे आहे. त्यामुळे या धरणातून होत असलेली पाण्याची गळती थांबल्यास या भागातील सुमारे 10 ते 12 गावांचा पिण्यासह सिंचनाचा पाणीप्रश्न (water issue) कायमस्वरूपी निकाली निघू शकणार आहे. मात्र ही गळती थांबविण्यास अधिकार्‍यांसह लोकप्रतिनिधींना लक्ष देण्यास वेळ नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

मागील वर्षी देखील तळवाडेभामेर धरणाच्या एमआय टँकला गळती लागली होती. या संदर्भात ग्रामस्थांनी तक्रारी करताच संबंधित यंत्रणेने ठेकेदारामार्फत तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी केली होती. धोका लक्षात घेऊन सांडवा सोडुन धरण खाली केले गेले होते. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पाटबंधारे विभागाचे (Irrigation Department) अभियंता देखील हजर होते. धरणातील काटेरी झाडेझुडपे बघुन मुख्यकार्यकारी अधिकार्‍यांनी एमआय टँक कुठे आहे? असा प्रश्न देखील संबंधितांना विचारत धरणासह परिसरात पसरलेल्या काटेरी झुडपांबाबत नाराजी व्यक्त केली होती.

निवडणूक (election) काळात मग ती लोकसभेची (lok sabha) असो की विधानसभा (vidhan sabha), जिल्हा परिषदेची (zilha parishad) तळवाडे एक्स्प्रेस कालवा पुर्ण करण्याचे आश्वासन सर्वांतर्फे दिले जातात मात्र कालवा अजून पुर्ण होवू शकलेला नाही. आता धरणालाच गळती लागून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. मात्र त्याकडे अधिकारी व लोकप्रतिनिधींचे लक्ष गेलेले नाही. दुरूस्तीच्या नावाखाली काम केले जाते बिले काढली जातात मात्र गळती काही थांबत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

पावसाळ्यात धरण पूर्ण भरते मात्र लिकेजमुळे उन्हाळ्यात पशु प्राण्यांना घोटभर पाणी सुद्धा मिळत नाही अशी विदारक अवस्था आहे. गळती थांबत नसल्याने या भागातील जनता हैराण झाली आहे येत्या आठ दिवसात जर याबाबत ठोस कार्यवाही झाली नाही तर गावातील ग्रामस्थाना सोबत घेऊन संबधित खात्यावर धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा माजी सरपंच शाम गायकवाड, पोपट गायकवाड, भाऊसाहेब भामरे, कृष्णराव गायकवाड, विलास गायकवाड आदींसह ग्रामस्थांनी दिला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com