गिरणा, पुनंद नदीवर बंधारे बांधणार

आवर्तन कायम राहणार : आमदार नितीन पवार
गिरणा, पुनंद नदीवर बंधारे बांधणार

कळवण । प्रतिनिधी Kalwan

स्व. ए. टी. पवारांनी कळवण तालुक्यातील (Kalwan Taluka) शेतकरी (Farmers) वा जनतेच्या हिताच्या योजना (Public interest schemes) राबवून ठिकठिकाणी सिंचन योजनांना (Irrigation schemes) प्राधान्य दिले. त्यांनी दिलेली शिकवण आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवून मतदार संघात दोन वर्षात कोट्याधीश रुपयांची कामे मार्गी लावली आणि प्रस्तावित आहे.

गिरणा (Girna)आणि पुनंद नदीवर (Punand River) गेटेड बंधारे बांधून सिंचन क्षमतेत वाढ करणार असून आवर्तन हे कायम राहणार आहे. त्यामुळे दिशाभूल करणार्‍याना भीक घालू नका’ असे आवाहन आमदार नितीन पवार (MLA Nitin Pawar) यांनी केले.

कळवण तालुक्यातील गाव संवाद दौर्‍यात नागरिकांना आमदार नितीन पवार, बाजार समिती सभापती धनंजय पवार, शेतकरी संघटना (Farmers Association) प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार, नगरपंचायत गटनेते कौतिक पगार, काँग्रेस (Congress) तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, राष्ट्रवादी काँग्रेस (Rashtravadi Congress) तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, हेमंत पाटील, संतोष देशमुख उपस्थित होते.

यावेळी बोलतांना आमदार पवार म्हणाले की, चणकापूर धरण (Chankapur Dam) वा गिरणा नदीपात्र कोरडेठाक होईल अशा विरोधकांच्या अफवांना भीक घालू नका.सन 2014 ते 2019 या काळात चणकापूर धरण कोरडे ठाक केले, चणकापूर धरणाचे आवर्तन 90 दिवसांचे केले. त्यावेळी गिरणा काठचे तथाकथित नेते मूग गिळून बसले होते. तेव्हा त्यांना शेतकर्‍यांचे हीत जोपसता आले नाही.

आता शेतकरी हिताच्या गप्पा मारुन विरोधाला विरोध करुन विकासकामांना खीळ घातली जातं आहे. चणकापूरचे आवर्तन 90 दिवसावरून 45 दिवसावर केले असून हे आवर्तन कायम राहील असा विश्वास आमदार नितीन पवार यांनी नागरिकांना दिला. शेती (Farming) आणि सिंचनासाठी आरक्षित हक्काच्या पाण्याला धक्का न लावता कळवण शहरातील पाणी पुरवठा योजना (Water supply scheme) राबवली जाणार आहे.

गिरणा नदीकाठच्या सर्व पाणी पुरवठा योजनांना त्यांच्या हक्काचं पाणी हे मिळणार आहे. गिरणा नदीपात्रात पाणी खेळतं रहावं, शेती, सिंचन अन पिण्याला पाणी मिळावं म्हणून 100 हेक्टर सिंचन क्षमतेचे गेटेड सिमेंट बंधारे गिरणा नदीवर बांधण्याचे नियोजन आमदार नितीन पवार यांनी केले असल्याची माहिती यावेळी दिली.

पाळे खुर्द (स्मशानभूमीजवळ)- 1 कोटी 35 लाख रुपये, दह्याणे बार्डे- 78 लाख 56 हजार, विठेवाडी सावकी -1 कोटी 32 लाख, ककाणे खेडगाव(1)- 1 कोटी 32 लाख, ककाणे खेडगाव (2)- 1 कोटी 34 लाख, कळवण बेहडी 1- 71 लाख, कळवण बेहडी (2)- 76 लाख, देसराने - 1 कोटी 33 लाख,पिळकोस - 93 लाख, निवाणे - 77 लाख,ओतूर (1)-1 कोटी 20 लाख, ओतूर (2)-91 लाख 12 हजार आदी कळवण तालुक्यातील बंधार्‍यांना प्रशासकीय मान्यता मिळाली असल्यामुळे 1440-24 सघमी पाणीसाठा होणार असल्यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ होणार असल्याचे आमदार नितीन पवार यांनी सांगितले.

यावेळी रामदास पाटील, बापु पाटील, भगवान पाटील, भाई दादाजी पाटील, विश्वास मोरे, पंडित वाघ, आबा वाघ, गिरीश देवरे, उत्तम पाटील, बाळू पाटील, दिलीप पाटील, शशिकांत पाटील, मनोज कामळस्कर, बाळासाहेब शिरसाठ दत्तात्रेय शिरसाठ, प्रकाश वाघ, केशव वाघ, देविदास पवार, नारायण वाघ, दिनकर शिरसाठ, बापू निकम, नामदेव पाटील, सचिन पाटील, भरत शिंदे, बाळासाहेब पाटील, प्रभाकर, हरी पाटील, कडू पाटील आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.