दखल: कांदा राजकीय पीक झाल्याने घोळ!

दखल: कांदा राजकीय पीक झाल्याने घोळ!

नाशिक | विजय गिते | Nashik

मागील सप्ताहात कांदा दरात मोठी घसरण झाली. उत्पादन खर्चाच्या 30-50 टक्के कमी दराने कांदा लिलाव (Onion Auction) सुरु आहेत. कांदा राजकीय पीक झाल्याने सगळा घोळ झाला आहे.

जीवनावश्यकमधून वगळून तसा प्रत्यक्षात काही फायदा झाला नाही, शेतकर्‍यांचे मरण यालाच म्हणतात, अशा त्वेषात कांदा उत्पादक शेतकरी (Onion growers) आपल्या भावना व्यक्त करत आहेत. आता यावर उपाययोजना करणार्‍या यंत्रणा, केंद्र व राज्य सरकार (Central and State Government) किती तातडीने व योग्य ती कार्यवाही करतात याकडे कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

साधारण सन 2000 सालापासून निर्यातीमधील धरसोडपणामुळे गुणवत्ता व चवीसाठी जगात एक नंबरवर असणारा भारतीय कांदा साईडट्रक (Indian Onion Sidetruck) झाल्याने कांदा उत्पादकांवर आजची ही दुर्दैवी वेळ आली आहे, असा स्पष्ट आरोप कांदा उत्पादक करत आहेत. सन 2014 नंतर शेती धोरणांमध्ये सकारात्मक बदल होतील, अशी अपेक्षा होती. पण... 15 लाख, दुप्पट उत्पन्न यासारख्या आश्वासनांप्रमाणेच शेतीचे आयात-निर्यात धोरणाचाही तितकाच फटका बसला आहे. कांदा दर स्थिर राहण्यासाठी शेतकर्‍यांकडील स्टोअरेज (Storage) क्षमता वाढणे गरजेचे आहे.

यासाठी कांदाचाळ बांधण्याची ज्या कांदा उत्पादकाची इच्छा असेल,अशा शेतकर्‍यांचा कृषि सहाय्यकाने बांधकामापूर्वीचा स्थळपाहणी जीपीएस फोटो आपलोड करुन तालुका कृषी आधिकारी (Taluka Agriculture Officer) यांनी कार्यारंभ आदेश देणे आवश्यक आहे. काम पुर्ण झाल्यावर बांधकाम पुर्ण झाल्याबाबत स्थळपाहणी अहवाल जीपीएस फोटो अपलोड करुन तत्काळ अनुदान शेतकर्‍यांच्या आकाऊंटला ट्रान्सफर (Transfer) केले तर नक्कीच शेतकर्‍यांकडील स्टोअरेज वाढेल. सध्या आनलाईन, लकी ड्रॉ नंबर मग भानगडीत प्रचंड वेळ जातो.

तोपर्यंत कांदा चाळ बांधायची इच्छा जिवंत राहिली तर ठिक. शिवाय अनुदान अत्यंत किरकोळ प्रमाणात मिळते. कारण स्टिल (steel), सिमेंट (Cement), पत्रा भाववाढ यामुळे मिळणारे अनुदान अतिशय शुल्लक ठरते. मिळणारे अनुदान हे 70 टक्के करणे आवश्यक आहे. याबरोबरच चाळीचे बांधकाम करणाराला तत्काळ कार्यारंभ आदेश व बांधकाम पूर्ण होताच अनुदान खात्यावर मिळाल्यास हा देखील कांदा दर स्थिर राहण्यास प्रचंड मोठा हातभार लागेल. आज गोर-गरीब कित्येक शेतकर्‍यांकडे कांदाचाळ नसल्याने कांदा विकायची इच्छा नसतांना देखील विकण्याशिवाय पर्याय नसतो, म्हणून तो विकतो हे वास्तव कोणी नाकारु शकेल?

बदलत्या वातावरणाचा फटका

सततचे बदलते हवामान, ढगाळ वातावरण, बेमोसमी पाऊस अशा बदलामुळे पोळ, रांगडा, उन्हाळ कांदा लागवडीच्या कालावधीतही बदल होत आहे. त्यातच निर्यात धोरणातील भारताने जागतिक पातळीवर गमावलेली विश्वासार्हता आणि धरसोडवृत्ती याचाही कांदा उत्पादकांना जबर फटका बसला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com