
नाशिक । प्रतिनिधी Nashik
जिल्ह्यातील टपाल विभागात ( Postal Department ) ग्राहकांच्या तक्रारींचे जलदगतीने निराकरण करण्यासाठी 22 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता डाक अदालतीचे ( Dak-Adalat ) आयोजन करण्यात आले आहे, असे नाशिक टपाल विभागाचे प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी कळवले आहे.
या डाक अदालतीचे आयोजन वरिष्ठ अधीक्षक, नाशिक डाक विभाग, नाशिक मुख्य डाक घराजवळ, त्र्यंबकरोड, नाशिक येथे करण्यात आले आहे. ग्राहकांनी आपल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आपले तक्रार अर्ज दोन प्रतीत वरिष्ठ अधीक्षक, टपाल विभागाच्या कार्यालयात 17 डिसेंबर 2022 पर्यंत सादर करावेत, असे आवाहनही प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी केले आहे.
या डाक अदालतीत पंजीकृत टपाल, स्पीड पोस्ट, बचत बँक, मनी ऑर्डर इत्यादींबाबत तसेच नाशिक विभागातील पोस्टल सेवेविषयी असणार्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निवारण झालेले नाही व याबाबत समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींचीही या डाक अदालतीत दखल घेतली जाणार आहे.