निवृत्तीवेतन धारकांसाठी 'या' तारखेला डाक अदालत

भारतीय डाक विभाग
भारतीय डाक विभाग

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

डाक विभागातील (Department of Posts) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या (retired employees) निवृत्ती वेतनासंबंधी (Pension) तक्रारींचे निवारण करण्यासाठी पोस्ट मास्तर जनरल (Post Master General), नवी मुंबई विभाग यांच्याद्वारे 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता पेन्शन अदालतीचे आयोजन (Organization of Pension Court) करण्यात आले आहे.

त्या अनुषंगाने पेन्शन (Pension) व परिवार पेन्शन घेणाऱ्या व्यक्तींनी विहीत नमुन्यातील आपले अर्ज 20 फेब्रुवारी, 2023 पर्यंत कार्यालयात सादर करावे, असे आवाहन नाशिक डाकघर विभागाचे (Nashik Post Office Division) प्रवर अधीक्षक मोहन अहिरराव यांनी केले आहे. सेवानिवृत्त डाक कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनासंबंधीच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी डाक विभागातर्फे नियमितपणे पेन्शन अदालतीचे आयोजन केले जाते.

यात कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचा योग्य प्रकारे न्यायनिवाडा करण्यासाठी डाक विभागाचे (Department of Posts) संबंधित अधिकारी तक्रारदारांना प्रत्यक्ष भेटतात. त्या अनुषंगाने सर्व संबंधितांनी विहीत मुदतीत आपले निवृत्ती वेतनासंबंधित तक्रारी अर्ज पोस्ट मास्तर जनरल, नवी मुंबई विभाग (Post Master General, Navi Mumbai Division) यांचे कार्यालय, दुसरा मजला, पनवेल मुख्य पोस्ट ऑफीस इमारत, नवीन पनवेल, रायगड 410206 या पत्त्यावर वेळेत सादर करावेत.

या पेन्शन अदालतीमध्ये कायदा संबंधित प्रकरणे, ई. वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेन्शन, टीबीओपी व एमएसिपी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढविणे, धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या आणि डी.पी.सि. च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणे विचारात घेतले जाणार नाहीत यांची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे प्रवर अधीकक्षक मोहन अहिरराव यांनी कळविले आहे.

अर्ज करतांना तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा, दिनांक व ज्या अधिकाऱ्यास मुळ तक्रार पाठवली असेल त्याचे नाव, हुद्दा तसेच सेवा निवृत्त झालेल्या कार्यालयाचे किंवा इतर विभागीय कार्यालयाचे नाव व सेवानिवृत्तीची तारीख, पी.पी.ओ क्रमांक, पेन्शन घेत असलेल्या पोस्ट ऑफिस व मुख्य पोस्ट ऑफीसचे नाव, घरचा पत्ता व फोन नंबर, थोडक्यात तक्रार असल्यास विवरणपत्र, पेन्शन घेणारा व परिवार पेन्शन घेणाऱ्या व्यक्तिची सही व तारीख आदि तपशिलवार माहिती आपल्या तक्रार अर्जात नमूद करणे आवश्यक आहे, असेही प्रवर अधीक्षक मोहन अहिरराव यांनी कळविले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com