आंबोली धरण
आंबोली धरण|digi
नाशिक

त्र्यंबकेश्वर शहरात आता दररोज पाणी पुरवठा

आंबोली धरण ४० टक्के भरले

Gokul Pawar

Gokul Pawar

त्र्यंबकेश्वर । Trimbakeshwer

दिवसाआड पाणी मिळत असलेल्या त्र्यंबक वासियांना आता दररोज पाणी असल्याची माहिती पाणी पुरवठा सभापती सौ शीतल उगले यांनी दिली.

दरम्यान त्र्यंबक शहराला पाणी पुरवठा करणारे आंबोली धरण ४० टक्के भरल्याने हा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी त्र्यंबक वासियांना एक दिवसाआड पाणी पुरवले जात होते. परंतु आता त्र्यंबक शहराच्या माथ्यावरील अहिल्या धरण व पाणीपुरवठा करणारे अंबोली धरण जवळपास ४० टक्के भरलेने हा निर्णय झाला असे शीतल उगले यांनी सांगितले

दरम्यान मुखाधिकारी संजय जाधव व नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्याशी चर्चा करून वरील निर्णय जाहीर करण्यात आला

Deshdoot
www.deshdoot.com