दै.'देशदूत'आयोजित 'बागलाण दर्पण पुरस्कार सोहळा-२०२३' : प्रगतिशील आदर्श शेतकरी

दै.'देशदूत'आयोजित 'बागलाण दर्पण पुरस्कार सोहळा-२०२३' :  प्रगतिशील आदर्श शेतकरी

प्रतिकूल परिस्थितीत स्वकर्तृत्वाने शेती व्यवसायात भरीव प्रगती करून आपल्या कुटुंबीयांचा लौकिक वाढवणारे तरसाळी (ता.बागलाण) येथील प्रगतशील शेतकरी व सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रभाकर दादाजी रौंदळ(Prabhakar Dadaji Roundal ) यांना दैनिक 'देशदूत' व श्रीधरतात्या कोठावदे मित्रमंडळाच्या वतीने ‘बागलाण दर्पण पुरस्कार-2023' प्रदान करतांना विशेष आनंद होत आहे.

रसाळी (ता. बागलाण)येथिल कै. दादाजी बाबाजी रौंदळ व धनूबाई रौंदळ यांच्या सर्वसामान्य कुटुंबातील प्रभाकरबापू हे त्यांचे जेष्ठ चिरंजीव. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाल्यानंतर माध्यमिक शिक्षण सटाणा येथील मराठा इंग्लीश स्कुल मध्ये पूर्ण केले. मात्र इच्छा असतांनाही घरची आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्यामुळे बारावीनंतर ते पुढील शिक्षण घेऊ शकले नाही. आईवडिलांसह दोन भाऊ एक बहीण असे कुटुंब असल्या मुळे प्रभाकर बापू यांनी वडीलो पार्जित शेती व्यवसाय करण्याचा निर्नय घेतला. वडिलापार्जित बारा एकर शेतीत त्यांनी जिराईत पिकं घेतली. मात्र त्यातून अपेक्षित असे उत्पन्न मिळत नसल्यामुळे शेती व्यवसायाला पूरक जोडधंदा म्हणून क्रेनचा व्यवसाय सुरू केला.

‘नर करनी करे सो, नर का नारायण होवे’ या उक्तीप्रमाणे प्रभाकर रौंदळ यांनी क्रेनच्या व्यवसायात अतिशय जिद्दीने व चिकाटीने अपार कष्ट घेतले. आणि त्यातून त्यांना अपेक्षित असे यशही मिळाले. पाच ते सहा वर्षे क्रेनचा व्यवसाय केल्यानंतर त्यांना चांगला आर्थिक फायदा झाला. परंतु 2007 सात नंतर पर्जन्यमान चांगले झाल्यामुळे भुजल पातळी वाढली आणि क्रेन व्यवसायाला मंदी आली. त्यामूळे शेती बागायती करण्याचा निर्नय घेऊन आपल्या शेतात विहीर खोदून पाच एकर क्षेत्र बागाईत करून त्यात डाळींब लागवड केली. त्यांनी घेतलेले कष्ट व मेहनतीला अखेर यश आले आणि हळूहळू त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत गेली. दरम्यानच्या काळात तिनही भावांचे व बहीणीचे लग्न झाले. तिनही भावांचे कुटुंब एकत्रित राहात असल्याने शेतीव्यवसायाची दिवसागणिक प्रगती होऊ लागली.

मात्र दरम्यानच्या कालावधीत सर्वत्र पर्जन्यमान जास्त झाले.परिणाम स्वरूप भूजल पातळीही मोठया प्रमाणात वाढली. क्रेनच्या व्यवसायाला खूपच मंदी आली. मुळे त्यांनी पुर्ण वेळ शेतीव्यवसायाकडेच आपले लक्ष केंद्रीत केले. हत्ती नदीच्या तिरावर नवीन विहीर खोदून तीन कि. मी. पाईप लाईन करुन त्यांनी आपल्या शेतात पाणी आणले. मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने संपूर्ण बारा एकर क्षेत्र त्यांनी ओलीताखाली आणून डाळींब, कांदा, मका या पिकांबरोबरच टमाटा, मिरची, कोबी अशी पिके घ्यायला सुरुवात केली. प्रभाकर रौंदळ यांचे क्षेत्र विंचूर-प्रकाशा राज्यमार्गा लगतच असल्याने शेती व्यवसायाला पूरक जोडधंदा म्हणून हॉटेल व्यवसाय सुरू केला. त्यांचे लहाण बंधू धर्मराज रौंदळ हा व्यवसाय सांभाळत आहे. उत्कृष्ठ जेवण आणि तत्पर सेवा यामुळे सह्याद्री ढाबा आज पंचक्रोशीत सुपरिचीत झाला आहे.शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मध्यंतरीच्या काळात दोन नंबरचे बंधू अनिल रौंदळ यांनी मेंढी व शेळीपालन व्यवसायही केला.

शेती हा बेभरवशाचा व अशाश्वत असा व्यवसाय आहे. कारण अपार कष्ट, मेहनत घेऊन लाखो रुपये खर्च करून शेतकरी द्राक्ष, डाळिंब, कांदा, मका व भाजीपाला असा शेतमाल पिकवतो. मात्र आपला शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत किंवा खाजगी बाजारपेठेत आनल्यानंतर त्यांच्या मालाला मातीमोल भाव मिळत असतो. जमाखर्चाचा ताळमेळ बसत नाही.परिणाम स्वरूप आर्थिक समस्या निर्माण होतात. आणि अशा परिस्थितीत नैराश्य येवून शेतकरी आत्महत्येसारखे अघोरी पर्याय निवडून आपले जीवन संपवितात. असे सांगताना प्रभाकर बापुंचे डोळे पाणावले होते. अशा परिस्थितीतून शेतकरी वर्गाला बाहेर काढण्यासाठी शासनाने शेतकर्‍यांच्या शेतीमालाला हमीभाव दिला पाहिजे. शेतकर्‍यांच्या मागणीनुसार शेतमालाची निर्यात वाढवली पाहीजे. त्याचबरोबर रासायनिक खतांचे वाढलेले भाव, बियाणे, किटकनाशक औषधे आदी शेती पुरक गोष्टींचे भाव कमी करून नियंत्रानात ठेवून बोगस रासायनिक खते व औषधे यांच्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. तसेच शेतकर्‍यांना दिवसा आठ तास विद्यूत पुरवठा कायमस्वरूपी करून तिला तरच सर्वसामान्य शेतकरी वर्गाची प्रगती होऊ शकेल असे परखड मत प्रभाकर बापूंनी व्यक्त केले.

प्रभाकर बापूंना शालेय जीवनापासूनच सामाजिक कार्याची आवड निर्माण झालेली होती त्यातच त्यावेळी प्रखर हिंदुत्ववादी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि विस टक्के राजकारण या विचारांनी प्रेरीत होऊन बापू शिवसेनेकडे आकर्षित झालेले आहेत. शिवसेनेचे शाखाप्रमुख, गण प्रमुख, गटप्रमुख व विभागप्रमुख म्हणून कार्यरत असतांना सामाजिक व सांस्कृतीक कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेत आले आहेत. तरसाळी ग्रामपंचायतीचे पाच वर्षे सरपंच तसेच ते दहा वर्ष ग्रामपंचायतीचे सदस्यही होते. सरपंचपदाच्या काळात पाणीपुरवठा योजनेसह ग्रामपंचायत इमारत, अंगनवाडी, मारुती मंदिर सभामंडप, रस्ते, मफपाणी आडवा, पाणी जिरवा या मोहिमेत माती नालाबांध व हत्ती नदीत भुमिगत बंधारे बांधून पाणीपातळी वाढवण्यासाठी प्रयत्न केले. अशी अनेक विकासकामे त्यांनी आपल्या कार्यकाळात केली.तरसाळी विवीध कार्यकारी सह. सोसायटीचे अनेक वर्षांपासून ते संचालक म्हणून शेतकर्‍यांच्या समस्या सोडण्यासाठी कामकाज करीत आहेत. तर 2017 मध्ये झालेल्या सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत संचालक म्हणून मातब्बर उमेदवारांचा मोठया मतांनी पराभव करून निवडून आले. त्यानंतर बाजार समितीचे उपसभापती म्हणून यशस्वी पणे कामकाज केलेले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com