
शैक्षणिक क्षितिजावर आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांची पिढी घडविणार्या सूर्या शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबाजी तथा पंडितराव त्रंबक पाटील (Panditrao Trambak Patil )यांना दैनिक 'देशदूत' व श्रीधरतात्या कोठावदे मित्रमंडळ यांच्यावतीने ‘बागलाण दर्पण पुरस्कार-२०२३’ प्रदान करताना विशेष आनंद होत आहे.
महाविद्यालयीन जीवनापासून विद्यार्थी चळवळीत सहभाग असलेल्या बाबाजी पाटील यांनी तालुका प्रतिनिधी म्हणून कामकाज केले. महाविद्यालयात सलग दोन वर्ष जिमखाना सेक्रेटरी व जनरल सेक्रेटरी पदांवर काम करण्यासोबत विद्यापीठ निवडणूकीत सहभाग घेतला. विद्यार्थी जीवनात बाबाजी पाटील यांनी मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे तत्कालीन सरचिटणीस स्वर्गीय डॉ. वसंतराव पवार यांच्या कार्यप्रणालीचा आदर्श घेत, सूर्या शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ, सटाणा या शिक्षण संस्थेची स्थापना केली. 1995 पासून सुरु झालेल्या संस्थेमार्फत आदिवासी - दलित वस्तीत शिक्षणाची सोय करण्यासह सन 2000 नंतर ग्रामीण व आदिवासी परिसरात माध्यमिक विद्यालय सुरु करण्यात आले. तसेच पाटील यांची हिंदवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात देखील वाटचाल सुरु आहे.
विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सुविधा निर्माण करतांना गुणवत्तेसोबत शिस्त व संस्कार आवश्यक असल्याचे मत व्यक्त करीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केंद्रीय स्तरावरील सी बी एस इ धर्तीवर शिक्षण प्राप्त व्हावे, यासाठी सटाणा शहरात ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल, ब्लॉसम हायस्कूल, ब्लॉसम ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स व ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल, दरहाणे या सी बी एस इ मान्यता प्राप्त स्कूल - कॉलेजची स्थापना केली.
परिसरातील विद्यार्थी-विद्यार्थिनी खर्या अर्थाने इंग्रजी शिक्षण घेत असतांना, त्यांचे इंग्रजी भाषेसह सायन्सच्या विषयांचे ज्ञान समृद्ध व्हावे यासाठी परिसरात सर्वप्रथम डिजिटल संकल्पना राबविण्यात आल्याचे स्पष्ट करीत पाटील यांनी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचा मानसिक व शारीरिक विकास घडावा, यासाठी शाळेच्या स्थापनेपासून योगा, ज्यूडो, कराटे, मैदानी खेळ यासाठी विशेष प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच व्यक्तिमत्त्व विकास, करिअर मार्गदर्शन, प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात येत असल्याचे सांगितले.
सटाणा येथील ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूलमध्ये विशेषतः सीबीएसइ धर्तीवर प्रायमरी शिक्षणासाठी विद्यार्थी घडवितांना अॅक्टिव्हिटीबेस एज्युकेशनचे अध्यापन करणारे कुशल व अनुभवी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असून, या सर्व घटकांच्या माध्यमातून टीमवर्कने शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचावण्यासाठी संस्थेचे संस्थापक बाबाजी पाटील यांच्यासह संचालिका व पाटील यांच्या पत्नी सौ. कल्पना पाटील यांच्यातर्फे दक्षता घेतली जाते. दरहाणे येथील ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून सी बी एस सी बोर्डाच्या धर्तीवर एन सी इआरटी अभ्यासक्रमातून भविष्यातील शिक्षणासाठी डिजिटल क्लासरूम्स, आडोटोरियम, भव्य व समृद्ध अशा, फिजिक्स, केमिस्ट्री, म्याथस, बायोलॉजी, जीओग्राफी, तसेच कॉम्प्युटर लॅब, लायब्ररी अशा अद्ययावत सुविधांसाठी कटिबद्ध असल्याचे पाटील यांनी सांगितले.
संगीत - सांस्कृतिक उपक्रमांसह इनडोअर - डोअर गेमसाठी आवश्यक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. विशेषतः विद्यार्थिनींना संरक्षणासाठी ज्यूडो-कराटे यांचे प्रशिक्षण दिले जाते. आरोग्य विषयक जनजागृतीसाठी तज्ञ डॉक्टर्स व सायबर सिक्युरिटी सारख्या विषयांवर माहिती वरीष्ठ पोलीस अधिकारी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात येतात. ब्लॉसम स्कूल व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये राज्य व राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केले आहे. निसर्गरम्य वातावरणात दर्जेदार शिक्षण देण्यासह विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थी - विद्यार्थीनी उल्लेखनीय कामगिरी करीत असल्यामुळे पालकांमध्ये संस्थेबद्दल विश्वासहर्ता निर्माण झाली आहे. विद्यार्थी - विद्यार्थीनी यांच्या संपूर्ण व्यक्तीमत्वाच्या जडणघडणीत सटाणा येथील ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल चारुता पाटील, व्हाइस प्रिन्सिपल योगिता कोठावदे, दरहाणे येथील ब्लॉसम इंटर नॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल रुपाली सोनवणे, व्हाइस प्रिन्सिपल प्रिती भामरे, सटाणा येथील ब्लॉसम गर्ल्स कॉलेज ऑफ सायन्सच्या प्रिन्सिपल वर्षा शिरोडे यांच्यासह सर्व उच्चशिक्षित शिक्षकांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे पाटील यांनी सांगितले.
सटाणा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सन्मित्र हौसिंग परिसरात एकाच कॅम्पसमध्ये पीसीएमबी व इतर विषयांची तयारी पूर्ण करण्यासाठी सन 2014 मध्ये ब्लॉसम ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सची स्थापना करण्यात आली. महाविद्यालयाने दरवर्षी 100 टक्के निकालाची परंपरा जोपासली आहे. सन 2017 मध्ये उभारण्यात आलेले दरहाणे येथील ब्लॉसमच्या कॅम्पसमध्ये आलेल्या सर्व विद्यार्थ्यांची यशस्वीतेकडे वाटचाल होत आहे. संस्थेचे संस्थापक बाबाजी पाटील व संचालिका सौ. कल्पना पाटील यांनी शैक्षणिक यशाचा आलेख मांडत असतांना, ब्लॉसम विद्यार्थ्यांसाठी दहावीनंतर मेडिकल - इंजिनीअरिंग प्रवेशासाठी आवश्यक नीट - जे इ इ या स्पर्धापरीक्षांच्या तयारी साठी नाशिक, पुणे, मुंबई, लातूर, कोटा आदी ठिकाणी जाणार्या विद्यार्थ्यांच्या यशात ब्लॉसममधील सीबीएसइ व एन सीइआरटीच्या धर्तीवर असलेल्या शिक्षणाचे श्रेय असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थी व पालकांतर्फे देण्यात येते.