दै.'देशदूत'आयोजित 'बागलाण दर्पण पुरस्कार सोहळा-२०२३' : ज्ञानदानाचा ध्यास

दै.'देशदूत'आयोजित 'बागलाण दर्पण पुरस्कार सोहळा-२०२३' : ज्ञानदानाचा ध्यास

मिळविलेल्या ज्ञानाचा समाजासाठी उपयोग व्हावा यासाठी वेगवेगळे तंत्रज्ञान आणून त्या संदर्भातील ज्ञान घेऊन काम करणारे करणारे नामपुर येथील अविनाश नारायण सावंत ( Avinash Narayan Sawant) उर्फ शरद दादा यांना दैनिक 'देशदूत' व श्रीधरतात्या कोठावदे मित्रमंडळाच्या वतीने 'बागलाण दर्पण पुरस्कार-२०२३' (Baglan Darpan Puraskar - 2023 )प्रदान करतांना विशेष आनंद होत आहे.

समाजात काही व्यक्ती अशा जगतात की त्या समाजसेवा करण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या असतात. अशा काही व्यक्ती चांगल्या प्रकारे शिक्षण घेतात अन् व्यवसाय करतात, पण त्यांचे मन रमत नाही. समाजसेवा हीच ईश्वर सेवा मानून आपण समाजाचे काही देणे लागतो या न्यायाने जगतात. अशाच प्रकारे जगणारे बागलाण तालुक्यातील नामपूर येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षक नारायण तुकाराम सावंत व इंदिराताई नारायण सावंत या आदर्श शिक्षक असलेल्या दाम्पत्यास तीन मुले व तीन मुली आहेत.

यात अशोक नारायण सावंत, मधुकर नारायण सावंत व अविनाश नारायण सावंतसह तीन बहिणी असा सुखी परिवार आहे. यात कनिष्ठ चिरंजीव अविनाश सावंत यांचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण हे नामपूर येथील शाळेत झाले. त्यानंतर खामगाव येथे स्थापत्य अभियंता शिक्षण पूर्ण केले. सहकारमहर्षी जयवंत नाना सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकार्याची सुरुवात केल्यामुळे त्यांना नामपूर येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक म्हणून तीन वर्षे काम करण्याची संधी मिळाली. तसेच नाशिक जिल्ह्यात सहकार तत्त्वावर भव्य मंगल कार्यालय उभारणीसाठी मोलाचे सहकार्य केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज सहकारी मंगल कार्यालयाचे ते अध्यक्ष असून नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक म्हणूनदेखील त्यांनी सलग तीन वर्षे यशस्वीरीत्या काम केले.

तसेच नामपूर बाजार समितीत सध्या विद्यमान संचालक म्हणून काम करत आहेत. अंबासन येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी सलग सहा महिने विशेष सेवा करून मार्गदर्शन केले. नागरिकांना योग प्राणायामचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी सन 2011 मध्ये योगगुरू रामदेव बाबा यांना आमंत्रित केले होते. या कार्यक्रमास नामपूरसह जिल्ह्यातील लाखो नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. तसेच नळकस येथे लोकसहभागातून भव्य श्रीराम मंदिर व सभामंडपाच्या उभारणीसाठीदेखील त्यांनी सहकार्य केले. बांधकाम क्षेत्राची आवड असल्याने त्यांनी बांधकाम क्षेत्रात विविध प्रकारची गुणवत्तापूर्ण कामे करून अनेकांना वाजवी दरात दर्जेदार उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण बांधकाम करत असताना कधीही नफ्याकडे लक्ष न देता गुणवत्ता हेच ध्येय ठेवल्याने सावंत यांनी नामपूर पंचक्रोशीत आपला नावलौकिक केला आहे.

आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच आई-वडील यांना आदर्श मानून स्वतःला समाजकार्यात झोकून दिले आहे. समाजातील कुठल्याही व्यक्तीच्या सुखदुःखात सदैव अग्रभागी राहणारे अविनाश दादा यांनी गोरगरीब जनतेची अनेक कामे करून विश्वास संपादन केला आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना स्वतःचे हक्काचे घर अल्प दरात कसे देता येईल याकडे आपला भविष्यात कल राहणार असून त्यादृष्टीनेदेखील आपले प्रयत्न सुरू राहणार आहेत. तरुणांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व्यवसाय आदींसह विविध व्यवसाय केल्यास भविष्यात कधीही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तसेच तरुणांनी नोकरी शोधण्यात आपला वेळ वाया न घालवता कुठलाही व्यवसाय सुरू करून आपले जीवन जगून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा.

जीवन जगत असताना प्रामाणिकपणे काम केल्यास मनुष्य हमखास यशस्वी होतो, असा अनुभव सांगितला. यशस्वी पुरुषांच्या पाठीशी पत्नीचादेखील सहभाग असतो. अविनाश सावंत यांच्या पत्नी वैशाली सावंत यादेखील एम.ए.बीपीएड आहेत. तर कन्या अभिलाषा अविनाश सावंत यादेखील बी.ई. सिव्हिलचे शिक्षण घेत आहेत. तर चिरंजीव रोशन अविनाश सावंत हादेखील बीएससी अ‍ॅग्रीचे शिक्षण घेत आहेत.

शेवटी अविनाश सावंत यांना आपण या व्यवसायात सुखी, समाधानी आहात का? असा शेवटचा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, होय, मी बांधकाम व्यवसाय मनापासून व जीव ओतून आनंद घेऊन करतो. त्यामुळे मी या व्यवसायात खरोखर आनंदी आहे. माझे बांधकाम पूर्ण झाल्यावर संबंधित व्यक्तीचे कुटुंबीय जेव्हा हास्यमुद्रेने पाहतात तेव्हा मला खूप समाधान वाटते. शेवटी आपल्या कामातून मिळालेले समाधान, आनंद, स्नेह व प्रेम हीच मोठी संपत्ती असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com