मालेगावात दहीहंडी उत्साहात

मालेगावात दहीहंडी उत्साहात

मालेगाव | Malegaon

येथील बारा बंगला भागातील (Bara Bungalow Area) मालेगाव युवा संघटनेची (Malegaon Youth Association) 'श्रीकृष्ण देवाची मानाची दहीहंडी' मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 'गोविंदा आला रे आला','बोल बजरंग बली के जय'च्या तालावर गोविंदा पथके थिरकल्याचे पाहायला मिळाले... .

देवाची मानाची हंडी मालेगाव येथील श्रीराम नगर भागातील (Sriram Nagar Area) श्रीराम स्वराज या मंडळाने पाच थर लावून फोडली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दहीहंडी (Dahi Handi) फोडणाऱ्या मंडळाला मानाचे चषक व १ रुपयाचे पारितोषिक आणि त्यात उपस्थित नागरिकांनी २१ हजारांची भर घालून एकूण २१ हजार १ रुपयाचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या दहीहंडी प्रसंगी स्कूल बस चालक धाडसी महिला भारती जाधव (Bharti Jadhav) व मालेगाव महानगरपालिकेतील स्वछता कर्मचारी लक्ष्मण सोनवणे (Laxman Sonawane) यांच्या कार्याचा गौरव करून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, साडी,शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी श्रीकृष्णाची वेशभूषा केलेले असंख्य बालगोपाल सहभागी झाले होते. तसेच दहीहंडी उत्सवाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने आबालवृद्ध, महिला, आपल्या बाळ गोपाळासह उपस्थित होत्या.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खा. सुभाष भामरे (MP Subhash Bhamre)संघटन मंत्री रवी अनासपुरे, भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, धर्म जागरण विभागप्रमुख प्रदीप बच्छाव, मनपा गट नेते सुनील गायकवाड, आम्ही मालेगावकार समितीचे निखिल पवार, नितीन पोफले, मदन गायकवाड, रविश मारू, दादा जाधव अरुण पाटील, सुनील देवरे, अजय मामा मंडावे वाला, विष्णू पाटोदिया यांच्यासह आदी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक युवा संघटनेचे प्रमुख देवा पाटील यांनी तर सूत्रसंचालन प्रवीण खैरनार यांनी केले.

तसेच दहीहंडी उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संघटनेचे मनोज पाटील, अमित अलई, निखिल पवार, सुशांत कुलकर्णी, सौ मोनाली पाटील, यांच्यासह कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या दहीहंडीत श्रीराम स्वराज ग्रुप,ए के ग्रुप, अक्षय ग्रुप, विर एक लव्य मित्र मंडळ अशा एकूण ४ गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com