नाशिक | प्रतिनिधी

शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया ठिकाणी पार्क केलेल्या एका दुचाकीसह चोरट्यांनी सायकल चोरून नेल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी देवळाली कॅम्प आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

देवळाली कॅम्प भागातील प्रशांत भास्कर केदारे (45 रा.जुनी स्टेशनवाडी) यांची शाईन मोटारसायकल (एमएच 15 ईडब्ल्यू 5842) दि.5 ऑगष्ट रोजी परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पार्क केलेली असतांना चोरट्यांनी पळवून नेली.

याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार जाधव करीत आहेत.

दुसरी घटना यशवंत व्यायाम शाळा भागात घडली. राहूल कारभारी सोनवणे (रा.गोविंदनगर) हे गेल्या शनिवारी (दि.12) नेहमीप्रमाणे यशवंत व्यायाम शाळेत गेले होते. पार्किंगमध्ये लावलेली त्यांची 15 हजार रूपये किमतीची सायकल चोरट्यांनी चोरून नेली.

याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार पठाण करीत आहेत.