वनविभागाच्यावतीने सायकल रॅलीचे आयोजन

वनविभागाच्यावतीने सायकल रॅलीचे आयोजन

नाशिक । विजय गिते Nashik

वनविभागाच्यावतीने Forest Department बुधवारी (दि.2) आडगाव नाका ते नांदूरमधमेश्वर अशी सायकल रॅली Bicycle rally from Adgaon Naka to Nandurmadhameshwar काढण्यात येणार आहे. पाणथळ जागा संरक्षणासाठी जनजागृती करण्यासाठी ही रॅली काढण्यात येणार आहे. वनविभागातर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दुपारच्या सत्रात पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात कोविड प्रतिबंधामुळे जानेवारी महिन्यात पक्षीगणना झाली नाही. डिसेंबर 2021 च्या महिन्यातील चौथी मासिक पक्षी गणनेनुसार वन अधिकारी, कर्मचारी, स्थानिक मार्गदर्शक, पक्षी प्रेमी, वन्यजीव अभ्यासक आणि स्वयंसेवक यांच्या मदतीने जानेवारी महिन्यात करण्यात आली.

या गणनेत चापडगाव, मांजरगाव, खणगावथडी, मध्येश्वरी गोदावरी नदीपात्र, कोठुरे, कुरुडगाव, काथरगाव अशा एकूण 40 ठिकाणी विविध पाणपक्षी प्रजाती व वृक्ष पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद करण्यात आली. एकूण 30 हजार 513 पक्षी 28 हजार 728 पाणपक्षी आणि 1,785 वृक्ष पक्षी मोजण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com