आरोग्य जनजागृतीसाठी सायकल रॅली

आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांची उपस्थिती
आरोग्य जनजागृतीसाठी सायकल रॅली

वणी। प्रतिनिधी Vani

‘आरोग्य जनजागृतीसाठी (Health Awareness) राबवण्यात येत असलेल्या सायकल रॅलीतुन (Bicycle rally) भविष्यात नक्कीच मोठे सायकलिस्ट (Cyclist) तयार होतील व आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करतील’ असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत (Kavita Raut) यांनी केले.

लसीकरण (vaccination), आरोग्य (Health), पर्यावरण (environment) जनजागृती करीत सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी येथील बुरड हॉस्पिटलच्यावतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी सकाळी 7 वा. बिरसा मुंडा चौकापासून रॅलीस हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. रॅलीत सहभागी सायकलपटूंना आयोजकांच्यावतीने स्पर्धे पूर्वी टी शर्ट देवून स्पर्धक नंबर देण्यात आला.

सायकल रॅलीस आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांच्या उपस्थित रॅलीस हिरवा झेंडा दर्शवून शुभांरभ केला. बिरसा मुंडा चौक वणी ते पिंप्री अंचला फाटा व परत बिरसा मुंडा चौक वणी अशी एकूण 21 किमी अंतराची रॅली संपन्न झाली. यात पहिल्या आलेल्या सायकल पाच सायकलपटूसंह पत्रकार दिगंबर पाटोळे यांना सहभागी सायकलपटू मध्ये सर्वात जेष्ठ सायकलपटू म्हणून रॅलीत सहभाग घेत स्पर्धकांचा उत्साह वाढवल्याबद्दल सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत,

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatna) प्रदेशाध्यक्ष प्रा. संदिप जगताप (Sandeep Jagtap), सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश कड (Assistant Inspector of Police Mangesh Kad) (मुंबई), पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. लक्ष्मण साबळे, द्राक्षशेती सल्लागार मधुकर शिंदे आदींच्या हस्ते बक्षीसे वितरीत केले. यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रविकुमार सोनवणे, माजी जिप सदस्य विलास कड, किसनालाल बोरा स्कूलचे अध्यक्ष महेंद्र बोरा, संताजी इंग्लिश मेडीयम स्कूलचे अध्यक्ष महेंद्र पारख,

नामदेवराव घडवजे, राकेश थोरात, सचिन कड, संपतराव जाधव, केआरटीचे मुख्याध्यापक डी. बी. चंदन, डॉ. अनिल पवार, बाळासाहेब घडवजे, मयुर जैन, मिनाताई पठाण, डॉ. अतुल बुरड, डॉ. निता बुरड, डॉ. सुचिता बुरड, नयन बुरड, महेश तुंगार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक आयोजक डॉ. प्रतीक बुरड यांनी तर सुत्रसंचलन पत्रकार नामदेव पैठणे, स्मिता पैठणे यांनी केले.

Related Stories

No stories found.