Video : महागाई विरोधात नांदगावला सायकल रॅली

Video : महागाई विरोधात नांदगावला सायकल रॅली

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

इंधन दरवाढ (Fuel price hike) व महागाई (Inflation) विरोधात नांदगाव तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने (Nandgaon Taluka Congress and City Congress Committee) सायकल रॅली (cycle rally) काढून केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला...

माजी आमदार अनिल आहेर (Anil Aher), महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस तथा महिला व बालकल्याण सभापती जि. प. नाशिक अश्विनी आहेर (Ashwini Aher) यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल रॅली काढण्यात आली.

केंद्र सरकारने सर्व सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. दिवसेंदिवस पेट्रोल डिझेल एलपीजी गॅस जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ काही थांबण्याचे नाव घेत नाही. फक्त सर्व पेट्रोल पंपावर 'अच्छे दिन अच्छे दिन' म्हणून छायाचित्र लावून जाहिरात बाजी केंद्र सरकार करत आहे. ही अवाजवी इंधन दरवाढ व महागाई या सरकारने थांबवली नाही. तर नांदगाव तालुका युवक काँग्रेस व शहर काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

याप्रसंगी नांदगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष हरेश्वर सुर्वे, युवा नेते दर्शन आहेर, नांदगाव शहर काँग्रेस अध्यक्ष मनोज चोपडे, मुनवर सुलताना, प्रवीण घोटेकर सरपंच चांदोरे, विलास चव्हाण, दिनकर धिवरे, बापू देवरे ,शिवाजी जाधव, सोमनाथ सोनवणे, दिवेश जाधव, रोहित सोनवणे, आसिफ तडवी आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com