सदृढ आरोग्यासाठी सायकल चालवा : वानखेडे

बागलाण सायकलिस्टचा वर्धापनदिन
सदृढ आरोग्यासाठी सायकल चालवा : वानखेडे

सटाणा । प्रतिनिधी | Satana

पर्यावरणाची हानी (Environmental damage) टाळण्यासोबत स्वत:चे आरोग्य सुदृढ (Good health) राखण्यासाठी सायकलींचा (bicycles) वापर करणे काळाची गरज आहे. सायकलींच्या वापराव्दारे रस्त्यावरील वाहनांची कोंडी (traffic jam) कमी करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन नाशिक सायकल फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे (Nashik Cycle Foundation President Rajendra Wankhede) यांनी केले.

येथील बागलाण सायकलिस्टच्या (Baglan Cyclist) वर्धापनदिनानिमित्त देवमामलेदार सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी पदावरून मार्गदर्शन करतांना वानखेडे बोलत होते. नाशिक पोलीस उपायुक्त संजय बारकुंड (Nashik Deputy Commissioner of Police Sanjay Barkund), किशोर माने, मालेगाव सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रेय पाटील, जेष्ठ पत्रकार विश्वास चंद्रात्रे,

बागलाण सायकलिस्ट अध्यक्ष डॉ. विशाल अहिरे, डॉ. विशाल खैरनार, मोहन सूर्यवंशी आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. जगातील बहुतांशी देशात प्रामुख्याने युरोपामध्ये नागरीक खाजगी वाहनांऐवजी सायकलीचा वापर करतात. या देशांमध्ये सायकलवरून कार्यालयात ये-जा करणे प्रतिष्ठेचे मानले जाते. आपण सुद्धा पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी व स्वत:चे आरोग्यही सुदृढ राखत सायकलींचा वापर वाढविणे गरजेचे असल्याचे वानखेडे यांनी शेवटी बोलतांना सांगितले.

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नाशिक (nashik) येथून रामदास सोनवणे, सुरेश ठोंबरे, निलेश धोंडगे हे सायकलने आले होते. वर्धापनदिनानिमित्त (anniversary) तालुक्यातील पिंपळदर परिसरात शनि महाराज टेकडीवर वड, पिंपळ, चिंच, उंबर, कडुनिंब आदी देशी वृक्षांची लागवड (Plantation of indigenous trees) करण्यात आली व जगवण्यासाठी शपथ घेण्यात आली. यावेळी शहरातील मुख्य रस्त्यावरून सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीचे कारगिल योद्धा माणिक निकम व डॉ. किरण आहिरे यांनी झेंडा दाखवून उदघाटन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विशाल आहिरे यांनी केले .

यावेळी सामाजिक बांधिलकी जपणार्‍या जगदीश कुलकर्णी, संजय जाधव, रोहित जाधव यांना सायकल मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ. शुभदा माजगावकर, तृप्ती काटकर, तनिष्क सोनवणे, सिध्दांत भामरे यांचाही सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी 1 जुलै ते 15 जुलै या कालावधीत आयोजित सायकल स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या पूनम भामरे, रोहिणी भामरे रुपाली सोनवणे यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैष्णव बच्छाव, मोहन सोनवणे, मनिष येवला,नितीन जाधव, भामरे, मोनिका बच्छाव, डॉ. क्रांती आहिरे, डॉ वर्षा बाविस्कर, रोहिणी भामरे, सुचिता सोनवणे, दिपक सोनवणे, प्रशांत रौंदळ, डॉ. किरण पवार, डॉ. किरण बोरसे, डॉ. महेंद्र कोठावदे, बाळासाहेब देवरे, शांताराम देवरे आदींनी परिश्रम घेतले. महेंद्र महाजन यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com