चोरट्यांच्या ना ना तऱ्हा; 'प्रिकॉशन डोस'च्या नावाखाली होऊ शकते फसवणूक

चोरट्यांच्या ना ना तऱ्हा; 'प्रिकॉशन डोस'च्या नावाखाली होऊ शकते फसवणूक

नाशिक | प्रतिनिधी

ऑनलाईन फसवणुकीच्या (Cyber Fraud) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सायबर गुन्हेगार वेगवेगळे कारण पुढे करत फसवणूक केल्याचे दिसून येत आहे...

सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी नवनवीन आयडिया शोधून काढत असून यातून आर्थिक फसवणुकीचे प्रमाण वाढलेले आहे.

करोनाच्या तिसरी लाट येऊन ठेपली आहे. दररोज हजारो रुग्ण करोनाबाधित होत आहेत. या पार्श्वभूमीवर बुस्टर डोससाठी नोंदणी सुरु झाली असून आजपासून लसीकरण सुरु झाले आहे.

सायबर गुन्हेगारांनी (Cyber Crime) कोरोनाच्या बुस्टर डोसच्या (Corona Booster Dose) नावाखालीच आता फसवणूक सुरू केली आहे.

बुस्टर डोस मिळवण्याच्या नावाखाली या स्मार्ट चोरट्यांनी वयोवृद्धांना बळी बनवण्यास सुरुवात केली आहे. बूस्टर डोससाठी नोंदणी करण्याच्या बहाण्याने ते फोनवर संपर्क करतात.

व ओटीपी क्रमांक विचारतात. डोसच्या नावाखाली ही मंडळी ओटीपी विचारते अन काही क्षणात तुमची बँक खाती रिकामेही ते करतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

अशा प्रकारे होते फसवणूक

 • अनोळखी संपर्क क्रमांकावरून फोन येईल

 • ते विचारतील तुम्ही दोन्ही लसी घेतल्या का?

 • तुम्ही हो म्हणतच ते तुम्हाला बुस्टर डोस घेण्यासाठी सांगतील

 • मी तुमची ऑनलाईन नोंदणी करतो आहे असेही विश्वास संपादन करत ते सांगतील

 • यानंतर तुम्हाला ओटीपी आलेला असेल तो तुम्ही सांगा असेही सांगतील

 • यानंतर भावनेच्या भरत तुम्ही जर ओटीपी सांगितला तर तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.

अशी घ्या काळजी

 • लसीकरणाबाबत ऑनलाईन नोंदणी करता येते यासाठी कुणीही फोन करत नाही

 • अशा फोन कॉल्सपासून सावध राहा

 • कुणालाही ओटीपी सांगू नका

 • बँकाही कधी ओटीपी मागत नाहीत

 • अशा फोन कॉल्सवरून कुणी माहिती विचारत असेल तर सायबर पोलिसांशी संपर्क करा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com