तलवारीने केक कापणे पडले महागात

गुन्हा दाखल
तलवारीने केक कापणे पडले महागात

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आपल्या वाढदिवसानिमित्ताने उपस्थितांमध्ये दहशत दाखविण्याच्या इराद्याने एका व्यक्तीने केक कापण्यासाठी तलवारीचा वापर Cut the cake with the sword केल्याने त्यासंदर्भात पोलिसांना गोपनीय माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1ने तलवारीसह सदर संशयिताला अटक करून त्याच्यावर भद्रकाली पोलीस ठाण्यात Bhadrakali Police Stationगुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ चे अंमलदार मुक्तार निहाल शेख यांना गस्ती दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एका व्यक्तीने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी बेकायदेशीररित्या तलवार आणून केक कापला.

यावरून त्यांनी सदर घटना वपोनी विजय ढमाळ यांना कळवली. वपोनी ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार रामदास भडांगे, प्रवीण कोकाटे, असिफ तांबोळी, मुक्तार शेख, नदीम पठाण यांनी बागवानपुरा परिसरात सापळा रचत मोहम्मद कैफ साजिद शेख ( १९, रा. घर नंबर ३१७२ कच्ची एंटरप्राइजेस नावाच्या दुकानाचे वर, बागवान पुरा, जुने नाशिक ) यास त्याच्या घरातून ताब्यात घेऊन त्याच्या घरात पलंगाखाली लपवलेली 1हजार रुपये किमतीची तलवार जप्त करून त्याच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाणे येथे आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.