नांदूरमध्यमेश्वर धरणास वक्राकार दरवाजे बसविणार

जलसंपदामंत्र्यांकडून तत्वता मान्यता- आ.बनकर
नांदूरमध्यमेश्वर धरणास वक्राकार दरवाजे बसविणार

Curved gates will be installed for Nandurmadhyameshwar dam

पिंपळगाव ब.। प्रतिनिधी Pimpalgaon Basvant

नांदूरमध्यमेश्वर धरणास Nandurmadhyameshwar dam अतिरिक्त 10 वक्राकार दरवाजे Curved gates आणि गोदापात्र रुंदीकरण कामाला राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील Water Resources Minister Jayant Patil यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत तत्त्वत: मंजुरी देण्यात आल्याची माहिती आमदार बनकर MLA Dilip Bankar यांनी दिली.

निफाड तालुक्याच्या दौर्‍यावर जलसंपदामंत्री आलेले असताना आ. बनकर यांच्यासह त्यांनी नांदूरमधमेश्वर धरणाला भेट दिली होती. यावेळी बर्‍याच कालावधीपासून अपूर्ण असलेल्या धरण परिसराच्या विविध अडचणी जाणून घेतल्या होत्या. तसेच या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी आ. बनकर यांना दिली होती. त्यांनी तत्काळ मंत्रालयात बैठक आयोजित केली.

बैठकीत आ. बनकर यांनी सांगितले की, नांदूरमध्यमेश्वर धरणात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी येत असल्याने धरण परिसरातील जवळपास 30 ते 35 गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसतो. पर्यायाने मोठ्या प्रमाणात शेतीसह उद्योगधंदे तसेच घरांचे नुकसान होत असल्याने नांदूरमध्यमेश्वर धरणास सन 2008 मध्ये एकूण आठ वक्राकार दरवाजे बसवण्याचे काम करण्यात आले. एका वक्राकार दरवाजाची वहन क्षमता जवळपास 12500 क्यूसेक इतकी असून आठ वक्राकार दरवाजे मिळून एकूण 1,00,000 क्यूसेक पाणी या दरवाजामधून विसर्गित केले जाते.

आठ वक्राकार दरवाजाचे काम पूर्ण झाल्यानंतर बाधित गावांतील नुकसानीचे प्रमाणदेखील कमी झालेले आहे. त्यामुळे नांदूरमध्यमेश्वर धरणास आणखी 10 ते 15 अतिरिक्त दरवाजे बसवल्यास निश्चितच बाधित होणार्‍या गावांचे प्रमाण कमी होऊन पुराच्या पाण्याचा विसर्ग अधिक क्षमतेने होऊ शकेल. याकरता जलसंपदा विभागाकडून सखोल अभ्यास करण्यात येऊन अभ्यासाअंती अंतिम अहवाल प्राप्त झालेला आहे. त्याअनुषंगाने तत्त्वत: मान्यतेसाठी प्रस्ताव जलसंपदा विभागाने शासनास सादर केलेला आहे. तरी नदीपात्राचे रुंदीकरण करणे तसेच अतिरिक्त 10 वक्राकार दरवाजे बसवणे असे दोन पर्याय करावे, अशी मागणी आ. बनकर यांनी केली.

त्यानुसार प्रस्तावास तत्त्वत: मान्यता तत्काळ प्रदान करावी, असे निर्देश दिले. तसेच नदीपात्राचे रुंदीकरण व 10 वक्राकार दरवाजे बसवणे या कामाचे संपूर्ण रेखाचित्रांबरोबरच रचनेच्या आराखड्यासह सखोल प्रस्ताव तयार करून शासनास सादर करण्याचे निर्देशदेखील देण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com