जिल्ह्यात जमावबंदी, संचारबंदी आदेश लागु

जिल्ह्यात जमावबंदी, संचारबंदी आदेश लागु

पुन्हा बाजारात पावती पद्धत

नाशिक | Nashik

लॉकडाऊन शिथिलता (Lockdown relaxed) मिळताच नागरीकांनी बाजार पेठांमध्ये एकच गर्दी केली आहे. परंतु दुसरीकडे पुन्हा एकदा रूग्ण संख्या (Corona Patients Increase) वाढीस लागली आहे. परिणामी संभाव्य तिसरी लाट (corona Third Wave) रोखण्यासाठी शहरातील जमावबंदी, संचारबंदी व मनाई (Curfew order) आदेश कायम ठेवण्यात आले आहेत.

त्यानुसार 28 जून ते 27 जुलै या कालावधीसाठी शहरात पहाटे पाच ते सायंकाळी 5 पर्यंत जमाबंदी तर सायंकाळी पाच ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. तसेच पुन्हा एकदा बाजार पेठा बंदिस्त करण्यात येऊन पावती पद्धत (Recipt Method ) लागु करण्यात आली आहे.

कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे (Delta Plus Veriant) संसर्ग फैलावून तिसरी लाट येण्याचा धोका आहे. त्यामुळे शासनाने निर्बंध कडक करीत नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच पोलिसांनी जमावबंदी, संचारबंदी आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. याआधी 8 जून रोजीचे आदेश रद्द करून पोलिसांनी 28 जूनला नव्याने आदेश लागू केले आहेत.

त्यानुसार जमावबंदी व संचारबंदीचे पालन करणे नागरिकांवर बंधनकारक असून विनाकाम घराबाहेर न पडण्याचे आदेशही पोलिसांनी दिले आहेत. अत्यावश्यक बाबींसाठी घराबाहेर पडताना आवश्यक पुरावा, कागदपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असून ते नसल्यास किंवा विनाकारण घराबाहेर फिरत असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पोलिस ठाणेनिहाय या आदेशांची अंमलबजावणी होत आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी भरारी पथके (Bharari squads) नेमण्यात आली आहेत. या पथकांमार्फत तपासणी करून नियम मोडणार्‍या व्यावसायिक किंवा नागरिकांवर कारवाई केली जाणार आहे. त्यात एक ते पाच हजार रुपयांचा दंड होणार आहे.

त्यानुसार पोलीस प्रशासनाने पुन्हा एकदा कंबर कसली असून शहरातील पहिलेच बॅरेकेडींग, तपासणी नाके आजपासून पुन्हा सुरू केले आहेत. तसेच बाजार पेठा सर्व बाजुने बंदिस्त करण्याची आज तयारी सुरू होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com