ऐका हो ऐका..! दवंडीची प्रथा झाली हद्दपार

ऐका हो ऐका..! दवंडीची प्रथा झाली हद्दपार

निफाड | Niphad

पूर्वी शासकीय असो की निमशासकीय कुठलाही कार्यक्रम असल्यास दवंडी देऊन ग्रामस्थांना निमंत्रण देण्याची परंपरा होती.

काळानुसार दवंडीची प्रथा आता हद्दपार झाली आहे. दवंडीच्या जागी आता मोबाइलवरील ग्रुपवर संदेश पाठवून कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे गटातील दवंडीचा आवाज ऐकावयास मिळत नाही.

तालुक्यातील भरपूर गावात पूर्वीच्या काळात शासनाच्या योजनांंची माहिती असो की ग्रामसभा, त्याचे जगजाहीरपणे दवंडी देऊन सूचना दिल्या जात असत. ग्रामपंचायतमधील कुठलाही व गावातील शासकीय कार्यक्रमाची सूचना दवंडी देऊनच कळवली जायची. त्यामुळे लोकांना घरपोच माहिती मिळायची. दवंडीचा आवाज आला की काहीतरी कार्यक्रम आहे हे निश्चित व्हायचे.

तसेच योजनेची माहिती फॉर्म, भरण्याची सूचना, ग्रामसभा असल्याचेही समजत असे. परंतू या आधुनिक काळात हा प्रकार ग्रामीण भागात बंद पडल्यात जमा झाला आहे. दवंडीमुळे वाचासारखी गोष्ट प्रसारित होत होती.

दवंडीच्या जागी आता कुठलाही कार्यक्रम असो शासकीय योजनांची माहिती, ग्रामसभेची सूचनाही सोशल मीडियाद्वारे ग्रुपवर टाकल्या जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात घुमणारा आवाज लुप्त झाला आहे. गावातील ग्रामसभेची सूचना दवंंडीतून पूर्वी कळायची.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com