गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम

गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

भारताच्या साजरा होणार्‍या 75 व्या स्वातंत्र महोत्सव वर्षांमधील 2022 मधील गणेश उत्सवाचे हे वर्ष ब्रह्मा व्हॅली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन (Brahma Valley Group of Institutions) तर्फे इन्स्टिट्यूशनतर्फे 31 ऑगस्टपासून एका वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होणारे होण्यास सुरुवात झाली आहे.

गणेशाच्या स्थापनेनंतर डॉ.रामकृष्ण लहवीतकर महाराज यांच्या सूरमधूर वाणीने किर्तन परंपरा सादर केली. सायंकाळी अ‍ॅड. दत्तात्रय पिंगळे (गोदावरी बँकेचे डायरेक्टर), भद्रकालीचे पोलीस निरीक्षक ठाकूर व चव्हाण यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. कीर्ती भवाळकर व विद्या देशपांडे यांच्या विद्यार्थिनींनी गणेश वंदना, पदन्यास सारखे अनेक नृत्यप्रकार सादर केले.

शाहीर स्वप्निल डुंबरे यांचा शिवशंभू हा विविध शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे चरित्र रेखाटणार्‍या पोवाड्यांचा बहारदार कार्यक्रम सादर झाला. लोककला महाराष्ट्राची हा महाराष्ट्रातील विविध लोककला आणि नृत्य यावर आधारित गायन नृत्याचा 28 कलाकारांचा सहभाग असलेला कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये प्रमुख्याने झी मराठी लिटिल चॅम्पस्ची विजेती गौरी गोसावी, झी युवा संगीत सम्राट फेम चेतन लोखंडे, नाशिकमधील सुप्रसिद्ध गायक जीतू देवरे व अश्विनी सरदेशमुख यांच्यासोबत नाशिक मधले प्रथितयश गायक-वादक कलाकार यांनी गाणी सादर केली.

या कार्यक्रमात नृत्यासाठी खास मुंबईहून मोना डोंगरे व त्यांचा नृत्यसमूह विविध नृत्यप्रकार सादर करण्यासाठी आले होते. नाशिकमधील सर्व गणेश भक्तांनी व रसिक प्रेक्षकांनी ब्रह्मा व्हॅली गणेशोत्सव 2022 मध्ये सादर होणार्‍या विविध कलाविष्कारांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे पाटील व सरचिटणीस गौरव पानगव्हाणे पाटील यांनी केले आहे. सर्व कार्यक्रम शरणपूर पालिका बाजार, तिबेटीयन मार्केट परिसरात दहा दिवस साजरे होते आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com