कादवाचा गळीत हंगाम शुभारंभ उद्या

कादवाचा गळीत हंगाम शुभारंभ उद्या

ओझे | Oze

कादवा सहकारी साखर कारखान्याचे 47 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ व श्रीराम शेटे संकुल (व्यापारी गाळे) उद्घाटन सोहळा गुरुवार दि. 2 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता ज्येष्ठ सभासद बाकेराव जाधव, दौलतराव उखर्डे, दौलतराव भालेराव, उध्दव मोरे, संजय पडोळ यांचे हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीराम शेटे राहणार आहे.

गव्हाण पूजा रमेश देशमुख (लखमापूर), प्रकाश देशमुख (करंजवण), बाळासाहेब धुमने (मडकीजांब), वामन बेझेकर (पिंपळगाव धूम), दत्तू कड (जोरन), वसंतराव उफाडे (वरखेडा), जितेंद्र दिघे (परमोरी), संजय घडवजे (तीसगाव), किरण देशमुख (खेडले), रावसाहेब मोरे (जालखेड), बाबाजी पगार (खडक ओझर) यांचे हस्ते संपत्नीक होणार आहे. सर्व सभासद ऊस उत्पादक यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन व्हा. चेअरमन शिवाजीराव बस्ते, सर्व संचालक व प्रभारी कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी केले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com