विकेंडला कश्यपी धरणांवर पर्यटकांची गर्दी

करोना नियम पायदळी
विकेंडला कश्यपी धरणांवर पर्यटकांची गर्दी

नाशिक | Nashik

एकीकडे जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना अशाही परिस्थितीत कश्यपी धरणावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते आहे. त्यामुळे अद्यापही नागरिक जबाबदारी नागरिकाची भूमिका पार पाडताना दिसत नाही.

दरम्यान शनिवार रविवार बाजारपेठा बंद असताना नागरिक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. शहराजवळील कश्यपी धरण, गंगापूर बॅक वॉटर आदी परिसरात नागरिक गर्दी करताना दिसून आले. यामुळे शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका वाढत आहे.

कश्यपी धरण शहरापासून जवळ असल्याने येथे शहरी पर्यटक मोठ्या संख्येने विकेंडला येत असतात. या ठिकाणी जीवाची पर्वा न करता सेल्फी, तसेच गर्दी करत आहेत. त्याचप्रमाणे वाढदिवस, पार्टी इत्यादींना या ठिकाणी उत आला आहे.

करोनाच्या या स्थितीत एकीकडे शहरात प्रशासन कडक निर्बंध लावत असताना ग्रामीण भागात मात्र नागरीक सर्रास गर्दी करत आहेत. यामुळे ग्रामीण भागात रुग्ण वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

कश्यपी धरणाच्या काठावर पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. विशेषतः सुट्टीच्या दिवशी जास्त गर्दी असते. यात तरुण तरुणींचा भरणा अधिक असतो। त्यामुळे वेळीच प्रधासनाने यावर आवर घालणे गरजेचे असून यामुळे ग्रामीण भागात कोरोना वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

- हिरामण बेंडकोळी, ग्रामस्थ

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com