सुरगाणा
सुरगाणा
नाशिक

सुरगाणा : भिवतास धबधब्यावर पर्यटकांची गर्दी

स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीचा बेत

Gokul Pawar

Gokul Pawar

दिंडोरी | Dindori

दोन दिवस संततधार पाऊस सुरू असल्याने सुरगाणा तालुक्यातील पार, वाजडी नदीला पूर आला असून भिवतास धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. भिवतास धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतांना दिसत आहेत.

दोन दिवस पश्चिम भागात सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे परिसरात चांगले वातावरण तयार झाले आहे. लहान नदी नाल्यांना पूर आला आहे. पश्चिम वाहिनी नार, पार, वाजडी नद्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी लहान पूल पाण्याखाली गेले आहे. भिवतास धबधबा ओसंडून वाहत आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीचा बेत आखून अनेक पर्यटकांनी भिवतास धबधब्याला भेट दिली. विशेष म्हणजे येथील एका युवकाने साधी झोपडी टाकून चहा पाण्याची व्यवस्था केल्याने त्यास चांगला रोजगारही मिळाला आहे.

यानिमित्ताने भिवतास धबधबा परिसरात पर्यटक आल्यास स्थानिकांना पुढील काळात रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचे देविदास कामडी यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com