Photogallery : नाशिककरांची खरेदीसाठी दुकानांसमोर झुंबड

Photogallery : नाशिककरांची खरेदीसाठी दुकानांसमोर झुंबड

सोशल डिस्टंसिंगचाही फज्जा

नाशिक । Nashik

नाशिकसह जिल्ह्यात उद्यापासून कडक लॉक डाऊन जाहीर करण्यात आल आहे..पण दुसरीकडे खरेदीच्या उद्देशाने लॉकडाऊनच्याच घोषणेनंतर नाशिकमध्ये लोकांनी दुकानांबाहेर तोबा गर्दी केली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये नागरिक गर्दी करत असून यावेळी सोशल डिस्टंसिंगचाही फज्जा उडाल्याचं चित्र आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात उद्यापासून बारा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे आज घरातील अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी जागोजागी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. आज सकाळपासून किराणा दुकानं, पीठ गिरणी आणि रेशन दुकानाबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

अनेक ठिकाणी रांगा लावून खरेदी तर अनेक दुकानाबाहेर गर्दीच गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालाच शिवाय कोरोनाचा धोका वाढतो कि काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आज सकाळपासून रविवार पेठ, दहीपूल, सिडको, आदी मुख्य बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. लॉकडाऊनमुळे रेशन दुकाने खुली होण्यापूर्वी नागरिकांनी रांगा लावल्या तर पीठ गिरणीतही जास्तीचे दळण दळण्यासाठी महिलांनी गर्दी केली आहे.

तर अनेक ठिकाणी रस्त्यालगत पार्किंग झाल्याने वाहनांची कोंडी यावेळी पाहायला मिळाली. त्यामुळे लॉकडाऊन पूर्वीची गर्दी व्हायला नको, यासाठी मनपाचे 'नाशिक बाजार' हे अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. ज्यावरून नागरिकांना भाजीपाला, दूध, औषधे यांची खरेदी करता येईल, परंतु नागरिकांनी अस न करता थेट बाजारातून जाऊन गर्दी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com