देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

शहरात गणेशोत्सव (Ganeshotsav) सुरु होऊन सात दिवस झाले असुन आता शेवटच्या टप्प्यात गणेश मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंंड गर्दी उसळत आहे.

रात्री बारा पर्यंत परवानगी असल्याने भाविक रस्त्यावर असतात. शहरातील गणेश मंडळांच्या आरास आता खुल्या झाल्या आहे. शनिवार आणि रविवारी सुटी असल्याने आरास पाहण्यासाठी गर्दी झाली होती.भालेकर मैदान, रविवार कारंजा, अशोक स्तंभ, पंंचवटी कारंंजा सह द्वारका येथील हिंदू एकता आंदोलन मंडळाच्या (Hindu Ekta Andolan Mandal) ठिकाणी भाविकांची गर्दी होत आहे. सुवर्ण मंदिराची प्रतिकृती, जय भोले ग्रुपचा केदारनाथ (Kedarnath) धामचा देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

रस्ते विद्युत रोषणाईने (Electric lighting) उजळले आहेत. बहुतांश मंडळांनी आकर्षक रोषणाई केली आहे. वेगवेगळ्या रंगाची रोषणाई नागरिकांची लक्ष वेधुन घेत आहे. राणे नगर येथील माजी सभागृह नेते सतीश सोनवणे यांच्या युनीक ग्रुपने भरवीलेल्या यात्रेचा हजारो भाविक मुक्तपणे आनंद घेत आहे. नवीन नाशिक (nashik) मध्ये यामुळे यात्रे सारखे वातावरण आहे. न्यू एरा इंग्लिश स्कूलमध्ये देशभक्तीपर गणेशोत्सव साजरा होत आहे.

यावर्षी शाळेच्या विदयार्थ्यांनी (students) गणेशोस्तवासाठी (Ganeshotsav) ‘नेशन फर्स्ट, अल्वेज फर्स्ट’ (Nation First, Always First) ही थीम निवडली होती. बुद्धिची देवता गणपतीची मूर्ती मंडपात मधोमध ठेवण्यात आली . तसेच विदयार्थ्यांचे दोन पुतळे उभे करण्यात आले होते. तसेच फलकांवर देशातील उल्लेखनीय कामगिरींचे प्रदर्शन साकारण्यात आलेे. ‘तिरंगा’ च्या पार्श्वभूमीवर पोस्टर्स, शुभेच्छा कार्डे, पेटिंग केलेले टी-शर्टस्, कोलाज करण्यात आले होते.

याचबरोबर महिला सक्षमीकरण (Women Empowerment), विविध क्षेत्रातील महिला जसे व्यावसायिक, औद्योगित, संरक्षण व खेळ जे देशाच्या नवनिर्माणात भर घालणारे आहेत, त्यांचेही प्रदर्शन मांडण्यात आले. राजपाल कॉलनी, पंचवटी बाल गणेशोत्सव मित्रमंडळ वतीने सत्यनारायण पूजा आयोजन करण्यात आले होते, परंतु पुजा कथन करण्यासाठी पुरोहित न मिळाल्यामुळे युट्यूब वरून मंत्रपठण करण्यात आले,परीसरातील नागरिक कडून त्याचे कौतुक करण्यात आले.

श्री राजे छत्रपती सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ,समाजसेवक स्व.शंकरराव निवृत्तीराव बर्वे सेवाभावी संस्था नाशिक गणेशोत्सव ा निमीत्त भारतातील एकमेव 1001 किलो ताम्र श्री लक्ष्मी गणेशाच्या आरतीचा मान भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताजी पवार यांना देण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com