पहाटेपासूनच लसीकरण केंद्रावर गर्दी

पहाटेपासूनच लसीकरण केंद्रावर गर्दी

सिन्नर । वार्ताहर Sinnar

नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावर ( Naigaon Primary Health Center ) लसीकरणासाठी पहाटेपासूनच गर्दी (Crowds for vaccination )झाल्याचे बघायला मिळाले. तुरळक लसीमुळे नागरिकांनी आरोग्य कर्मचार्‍यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यानंतर गावातील काही नागरिकांनी पुढाकार घेऊन वातावरण शांत केले.

नायगाव आरोग्य केंद्रावर परिसरातील 22 गावे अवलंबून असून आतापर्यंत पहिला व दुसरा डोस मिळून सुमारे नऊ ते दहा हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. परिसरातील लोकसंख्येच्या प्रमाणात लस उपलब्ध होत नसल्याने डॉक्टरांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

बुधवारी नागरिकांनी पहाटेपासूनच लसीकरण केंद्रावर गर्दी करण्यास सुरुवात केली होती. सकाळी आठ वाजेपर्यंत केंद्रावर जवळपास चारशे ते पाचशे नागरिक उपस्थित होते. यामुळे आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांमध्ये बाचाबाची होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

जादा डोस उपलब्ध करा

आरोग्य विभागाने परिसरातील गावांची संख्या लक्षात घेता जास्त प्रमाणात डोस उपलब्ध करून द्यावे. तसेच प्रत्येक गावात लसीकरणास सुरुवात झाल्यास एकाच केंद्रावर नागरिकांची गर्दी होणार नाही व लसीकरण सुरळीत सुरू राहील.

समाधान कदम, सरपंच

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com