Photogallery : नाशकातील लॉकडाऊनचा पहिला दिवस

; रस्त्यांवर वर्दळ, बाजार समिती 'हाऊसफुल्ल'
Photogallery : नाशकातील लॉकडाऊनचा पहिला दिवस

नाशिक | Nashik

करोनाला अटकाव करण्यासाठी जिल्ह्यात दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. आज पहिल्याच दिवशी रस्त्यावर तुरळक वर्दळ पाहायला मिळाली तर बाजार समितीत भाजी खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळाली.

करोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी जिल्ह्यात आज दुपारी बारा वाजेपासून दहा दिवसासाठी कडक लाॅकडाऊन लागू आहे. भाजीपाला विक्रीसह दूध व इतर सेवांबाबत जनसामान्यात गोंधळाची स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी काल मुख्य बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून आली.

आज सकाळच्या सुमारास तुरळक प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान, अत्यावशक कारण वगळता घराबाहेर पडू नका असे आवाहन जिल्हाप्रशासनाकडून करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com