नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

संजय गांधी निराधार योजनेच्या शहर हद्दीतील लाभार्थ्यांची हयातीचे दाखले जमा करण्यासाठी जिल्हाधिकार्यालयात गर्दी होत आहे. लाभार्थ्यांनी येत्या ३१ मार्च पुर्वी हयातीचे दाखले सादर न केल्यास १ एप्रिल पासून त्यांचे लाभ देणे प्रत्यक्षात बंद केले जाणार आहे. शहरात नऊ हजारांहून अधिक लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात.

संजय गांधी निराधार योजनेंतर्गत विविध लाभार्थ्यांना थेट आर्थिक लाभ दिले जातात. त्यासाठी दरवर्षी हयातीचे दाखलेही त्यांना सादर करणे आवश्यक आहे. पण अनेकदा हे लाभार्थी नसतानाही त्यांचे नावाचे लाभ हे इतरच व्यक्ती घेत असल्याचे प्रकार घडले आहे.

त्यामुळे शासनाने प्रत्येक वर्षी मार्च महिन्यात संबधित लाभार्थ्यांला आपले हयातीचे दाखले सादर करावे लागतात. नाशिक जिल्ह्यात तब्बल ९ हजारावर संजया गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत. त्यानुसार या वेळीही सर्वच लाभार्थ्यांना आपले हयातीचे दाखले संजय गांधी नाशिक शहर या कार्यालयात स्वत: उपस्थित राहून आपले पुरावे सादर करायचे आहे.

ज्या लाभार्थ्यांना हे शक्य नाही, वयोवृध्द अथवा आजारी लाभार्थ्यांसाठी यंत्रणेकडूनच त्यांच्या घरी जाऊन याची खात्री केली जाते. तर काहींना थेट वाहानातून कार्यालयात आणले जाते. परंतू लाभार्थ्यांच्या हयातीची खात्री करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सर्वच लाभार्थ्यांनी ३१ मार्च पुर्वीच आपले हयातीचे दाखले सादर करण्याचे आवाहन तहसीलदार गवळी यांनी केले आहे.

शिवाय बाहेरगावी गेलेल्यांनीही आपले पुरावे सादर केल्यानंतरच त्यांना लाभ दिला जाईल. दाखले जमा करण्यासाठी अवघा दीड महिना शिल्लक राहिल्याने हयातीचे दाखले जमा करण्यासाठी कार्यसलयात गर्दी होत आहे.

लाभार्थ्यांनी त्यांचे हयातीचे दाखले संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात ३१ मार्च पुर्वी सादर करावे.
दिपाली गवळी, तहसिलदार, संजय गांधी निराधार पेंशन योजना