त्र्यंबकेश्वरला वारकऱ्यांची मांदियाळी

त्र्यंबकेश्वरला वारकऱ्यांची मांदियाळी

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar

येथे कार्तिक कृष्ण उत्पत्ती एकादशीच्या (Kartik Krishna Utpatti Ekadashi) निमित्ताने संत निवृत्तीनाथ महाराजांच्या (Saint Nivrittinath Maharaj) समाधीचे दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांच्या दिवसभर रांगा लागलेल्या होत्या...

पहाटेपासून भाविकांनी थंडीमध्ये (Cold) कुशावर्तावर (Kushavarta) स्नानासह निवृत्तीनाथ मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. तसेच महिन्याची वारी असल्याने कुटुंबातील एक तरी व्यक्तीने येथे वारीसाठी येण्याचा प्रघात असून वारकरी (varkari) भक्त यात खंड पडू देत नाही. त्यामुळे आज सर्व मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी होती.

तसेच समाधी मंदिराच्या आवारात बांधकाम सुरु असून अकरा कोटी रुपयांपेक्षाही जास्त रकमेची विविध कामे होणार आहेत. त्यातच वारकरी भाविक देखील या मंदिराच्या ट्रस्टला मोठ्या देणग्या देतात. याशिवाय आज आळंदीला (Alandi) यात्रा असल्याने तेथे जाता न आल्याने ज्ञानदेवांचे गुरु व जेष्ठ बंधू निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी चरणी लीन होण्यासाठी वारकरी हजेरी लावतात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com