Video : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पर्यटकांची गर्दी
नाशिक | Nashik
नाशिकला (Nashik) पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्व आहे. तसेच बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेले 'त्र्यंबकेश्वर' चे ज्योर्तिलिंग आणि गोदावरी नदीचा (Godavari River) झालेला उगम याच जिल्हयात असल्याने या जिल्हयाचे देशासह महाराष्ट्रात (Maharashtra) अधिक महत्व वाढले आहे.
त्याचबरोबर साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेले आई सप्तश्रृंगी देवीचे मंदिर देखील या जिल्ह्यात आहे. तर गोदावरी तिरी 'रामकुंड' असल्याने आजही लाखो लोक आपल्या 'मृत' आप्तस्वकीयांच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी याठिकाणी येतात.
तसेच विविध प्रथा परंपरा यांची सोनेरी किनार लाभलेला नाशिक हा जिल्हा आधुनिक आणि पुरातन गोष्टींची सांगड घालत आज खूप मोठया प्रमाणावर विस्तारलेला असल्याने याठिकाणी देशभरातील असंख्य पर्यटक (Tourists) येत असतात.
अशातच आता नवीन वर्ष (New Year) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने पर्यटकांची नाशकात गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर देशदूतचे प्रतिनिधी शिवाजी जाधव यांनी पर्यटकांशी साधलेला संवाद...